pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिक्षक, मुख्याध्यापकांनी जबाबदारीचे भान ठेवावे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी यांची योगदान महत्त्वाचे असते – शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/दत्ता देशमुख,दि.24

वरिष्ठ कार्यालयाकडून कालमयदित माहिती मागविली असता, अनेक मुख्याध्यापक हलगर्जीपणा करतात, माहिती देण्यात दिरंगाई करतात. वर्ग अध्ययन अध्यापनात शिक्षकही चालढकलपणा करतात, आपण शासनाचे वेतन घेतो, यासाठी जबाबदारीचे भान असायलाच पाहिजे, असा कानमंत्र मुख्याध्यापकांना शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात यांनी बैठकीत दिला, हे विशेष.. शहरातील जेईएस महाविद्यालयात जिल्ह्यातील मुख्याध्यापकांची म हत्वाची बैठक बोलाविण्यात आली होती. बैठकीत कालमर्यादत माहिती सादर करण्याचा विषय होता, जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर रिक्त आणि अतिरिक्त पदे याची माहिती देणे. बरिष्ठ पातळीवर तात्काळ माहिती देण्यासाठी बोलविलेल्या बैठकीत अनेक मुख्याध्यापक अनुपस्थित होते, यात माहिती सादर करण्याची संख्या कमीच होती. महत्वाची बंधनकारक माहिती द्यायची असतानाही अनेक मुख्याध्यापकांचा हलगर्जीपणा, दिरंगाई होत असल्याने शिक्षणाधिकारी यांनी सक्त सूचना युडायस, सरल आणि अपार आयडी यात माहिती भरताना ती परिपूर्ण भरता आली पाहिजे, असे सांगून विद्यार्थी पटसंख्या कशी वाढेल आणि शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे देता येईल, यासाठी शिक्षकांनी परिणामकारक अध्यापन केले पाहिजे, असा सल्लाही शिक्षणाधिकारी खरात यांनी दिला. बैठकीस उपशिक्षणाधिकारी अनिल पवार, वेतन पथक अधिक्षक चतरसिंग परदेशी, जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष सचिन देशमुख, प्रा. बिक्कड, अनिल भेरे, पोहेकर, दुर्गम यांची उपस्थिती होती. तीन तास चाललेल्या बैठकीत शिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना सक्त सूचना देत जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तापूर्ण शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न जाणीवपूर्वक करावे, असेही शिक्षणाधिकारी खरात यांनी सांगितले. देत वेतन पथक अधिक्षक चतरसिंग परदेशी यांना अशा मुख्याध्यापकांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्यात यावे, असे बैठकीत सांगितले. माहिती देण्यात टाळाटाळ करीत असलेल्या मुख्याध्यापकांना खडे बोल सुनावत पगाराशी नुसतीच बांधीलकी ठेवू नका, आपल्या जबाबदारारी आणि कर्तव्याचे भान ठेवा, असे सुनावताच सभागृहात शांतता दिसून आली. शासन ________________________________________

बैठकीत लक्षवेधी मुद्दे प्रत्येक शाळेतील प्रत्येक वर्गात आणि शालेय परिसरात सीसीटीव्ही सक्तीचे (१) विद्यार्थी सुरक्षा समिती कागदावर (२) ३ शालेय विद्यार्थ्यांत’ गुड टच बॅड टच’ याबाबत समुपदेशन करणे बंधनकारक. (४) प्रत्येक शाळांमधून ‘ एक पेड माँ के नाम’ उपक्रम कृतीशीलपणे राबविला जावा, केवळ फोटोसेशन करीत फोटो काढू नये.. (५) प्रत्येक शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात तक्रार पेटी आवश्यक असून आलेल्या तक्रारीचे निवारण करणे अनिवार्य. (६) शालेय विद्यार्थी उपस्थिती टक्का वाढविण्यासाठी पालकसभा, भेटी आणि बैठका घेण्यात याव्यात. दहावी-बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त( ७) अभियानाची जनजागृती करणे आवश्यक. _____________ निर्णयाचा मुख्याध्यापकांनी अभ्यास करून याबाबत कार्यवाही करावी, असे सांगून दररोजची ऑनलाइन ऑफलाईन माहिती देताना परिपूर्णतेने सादर करावीच लागणार आहे. डिजिटल हायटेक टपाल पद्धतीसह ईऑफीस प्रणाली आलेली आहे, नवीन बदल स्वीकारा तरच अपडेट राहता येईल, नसता या व्यवस्थेतून स्वतःहून बाहेर पडा, असा सल्लाही शिक्षणाधिकारी खरात यांनी दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे