pub-7425537887339079
ब्रेकिंग

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन 29 जुलै रोजी जालन्यात विविध सांस्कृतिक, साहित्यिक व सर्जनशील स्पर्धा; युवकांना सहभागाचे आवाहन

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.24

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत कार्यरत माय भारत, जालना यांच्या वतीने जिल्ह्यात ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या जनजागृतीपर अभियानांतर्गत विविध जिल्हास्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. व्यसनमुक्तीबाबत युवकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, त्यांच्या सृजनशीलतेला वाव देणे आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचा सक्रिय सहभाग वाढविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानांतर्गत युवकांसाठी सांस्कृतिक, साहित्यिक आणि सर्जनशील अशा विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यामध्ये सामूहिक लोकगीत गायन, सामूहिक नृत्य, पथनाट्य, वैयक्तिक चित्रकला स्पर्धा, शॉर्ट फिल्म किंवा रिल स्पर्धा, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री (मौखिक कविता) तसेच भाषण स्पर्धेचा समावेश असणार आहे. या सर्व स्पर्धेंचा विषय ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या अभियानाशी संबंधित असून, व्यसनमुक्ती, निरोगी जीवनशैली, सामाजिक जबाबदारी आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका या विषयांवर आधारित सादरीकरणे अपेक्षित आहेत. या माध्यमातून युवकांना समाजप्रबोधनाची संधी मिळणार असून व्यसनमुक्त समाज घडविण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचविण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय स्पर्धा दि. 29 जुलै 2026 रोजी सकाळी 10.30 वाजता डॉ. वेदप्रकाश पाटील आयुर्वेद महाविद्यालय व संशोधन केंद्र, रेगाव रोड, जालना येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था तसेच 15 ते 29 वर्षे वयोगटातील युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मयुरकुमार गोरमे, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना यांनी केले आहे. स्पर्धांबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा युवा अधिकारी, माय भारत, जालना यांच्याशी 8830057471 किंवा 7875464703 या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा mybharatjalna@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे