टेंभुर्णी येथील बरड वस्तीवरील चिखलमय रस्त्यांमुळे शाळकरी मुलांचे हाल; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष,, आज काय टेंभुर्णीचा विकास नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.25
पावसाळा सुरु होताच ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था आणि त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागणारा त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. टेंभुर्णी जवळील बरड वस्ती येथील मुख्य रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला असून, विद्यार्थ्यांना दररोज चिखलातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. बरड वस्तीच्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याचे मोठे डबके साचले असून, संपूर्ण रस्ता चिखलाने माखला आहे. रस्त्यावरुन चालताना पाय घसरुन मुले पडण्याची आणि त्यांना दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शाळेत पोहोचण्यापूर्वीच मुलांचे कपडे आणि बूट चिखलामुळे खराब होत आहेत, ज्यामुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे प्रशासनाने मुलांच्या भविष्याशी न खेळता रस्ता तातडीने दुरुस्त करावा-मुगूटराव मुलांना शाळेत पाठवताना आम्हाला दररोज काळजी लागून राहते. चिखलामुळे मुले अनेकदा घसरुन पडतात, त्यांचे कपडे-बूट खराब होतात आणि त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. आमच्या मुलांच्या या त्रासाकडे कोणाचेच लक्ष नाही. प्रशासनाने आमच्या मुलांच्या भविष्याशी खेळू नये आणि हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी टेंभुर्णी येथील शुभम मुगूटराव यांनी केली आहे. लागत आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे आणि खडीकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. बरड वस्तीतील मुलांचा शाळेचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी प्रशासनाने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे.




