pub-7425537887339079
ब्रेकिंग

Rj & संजीवनी क्लासेस टेंभुर्णी येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

0 5 2 0 1 9
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5

टेंभुर्णी ता जाफराबाद येथील Rj & संजीवनी क्लासेस येथे वर्ग 10 वी मध्ये प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने करिअर निवडताना संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून ऑर्किड ज्युनियर कॉलेज संभाजीनगर येथील प्राध्यापक श्री गणेश सर व श्री संजय सर यांची उपस्थिती होती. प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. मार्गदर्शन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त गुण ओळखून वर्ग 10 वी नंतर कोणती शाखा निवडावी यावर चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे होमगार्ड पासून तर जिल्हाधिकारी, पीएसआय, एपिआय,सीए तसेच विविध स्पर्धा परीक्षा याविषयी सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांनी सुद्धा आपल्या मनामधील अनेक प्रश्नांची उत्तरे चर्चा मार्फत शोधण्याचा प्रयत्न केला. पालकांमधून या शिबिराविषयी समाधान व्यक्त करण्यात आले. प्राची गडकर व सोनाली सपकाळ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा सतीश जाधव सर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ ज्योती सांगळे मॅडम, सौ भाग्यश्री जाधव मॅडम, श्री रामेश्वर सांगळे सर यांनी विशेष परिश्रम घेतले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 2 0 1 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे