pub-7425537887339079
ब्रेकिंग

बजाजनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी पुण्यतिथी निमित्त सप्ताहात विविध उपक्रमांची मांदियाळी

हजारो भाविक - सेवेकरी घेत आहेत उपक्रमांचा लाभ

0 4 1 2 2 1
[sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर /अनिल वाढोणकर,दि.12

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरूपीठ, त्र्यंबकेश्वर येथील पिठाधिष परमपूज्य गुरूमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आशिर्वादाने बजाजनगर येथील दिंडोरी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात श्री स्वामी पुण्यतिथी निमित्ताने अखंड-नाम-जप-यज्ञ व श्री गुरूचरीञ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात करण्यात आलेले आहे. दिनांक ०९ एप्रिल पासून या सप्ताहाला सुरवात झाली असून दिनांक १५ एप्रिल २०२६ रोजी महानैव्यद्य आरतीने या सप्ताहाची सांगता होणार आहे. या सप्ताहात एकुण १२४७ सेवेकरी श्री गुरूचरीञ पारायणासाठी बसले आहेत. यामध्ये महिला सेवेकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. सप्ताह काळात विविध प्रकारच्या अध्यात्मिक सेवेचे व समाजोपयोगी उपक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
दैनंदिनी मध्ये सकाळी ६.०० वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांचा महाभिषेक, ६.१५ वाजता नित्यस्वाहाकार, ६.०० ते ८.०० पर्यंत सामुदायिक श्री गुरूचरीञ पारायण वाचन ७.३० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, ८.०० वाजता भूपाळी आरती, ०८.३० ते १०.३० वाजेपर्यंत विषेश याग, १०.३० वाजता नैवेद्य आरती, दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत श्री स्वामी चरित्र सारामृत, श्री दुर्गा सप्तशती पाठ व श्री रूद्रावर्तने, सायंकाळी ६.०० वाजता औदुंबर प्रदक्षिणा, सायंकाळी ६.३० वाजता नैवेद्य आरती, ७.०० वाजता विविध विषयांवर मार्गदर्शन, ७.३० वाजता श्री विष्णू सहस्त्रनाम होत आहे. रोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत महिला सेवेकरी व रात्री ८.०० ते सकाळी ८.०० या वेळेत पुरूष सेवेकरी प्रहरेची सेवा रूजू करत आहे. विषेश यागामध्ये दिनांक १० एप्रिल रोजी श्री गणेश याग व श्री मनोबोध याग, ११ एप्रिल रोजी चंडी याग, १२ एप्रिल रोजी स्वामी याग संपन्न झाले आहेत. दिनांक १३ एप्रिल रोजी गीताई याग, १४ एप्रिल रोजी श्री रूद्र याग व मल्हारी याग होणार आहे. सप्ताह कालावधीतील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या २०% अध्यात्म आणि ८०% समाजकार्य या सुत्रातून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ एप्रिल रोजी दुपारी ५.०० ते ६.०० वेळेत गर्भसंस्कार, शिशुसंस्कार शिबीर घेण्यात येणार आहे. सर्व नवविवाहित व गरोदर महिलांनी गर्भसंस्कार शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ०८.०० ते रात्री ०८.०० या वेळेत रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १५ एप्रिल रोजी बली पूर्णाहूती तसेच श्री सत्य दत्त पूजन, देवता विसर्जन व सकाळी १०.३० ची सांगतेची महानैवेद्य आरती होणार आहे.
धकाधकीच्या जीवनात अध्यात्मिक स्थैर्य व मनःशांती मिळवण्यासाठी सप्ताहकाळ ही अभूतपूर्व पर्वणी ठरणार आहे. बजाजनगर केंद्रातील व्यवस्थापन व नियोजन प्रतिनीधींच्या वतीने पंचक्रोशीतील सर्व भाविक सज्जन, भक्तगण व सेवेकरी यांना या अतिदुर्लभ अध्यात्मिक सेवेत सहभागी होऊन स्थापित देवतांचे कृपाशिर्वाद प्राप्त करून घेण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 2 2 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे