pub-7425537887339079
ब्रेकिंग

कर्जाच्या विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.25

जाफराबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के येथील तरुण शेतकऱ्याने कर्जाच्या विवंचनेत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान घडली. मयत शेतकऱ्याचे नाव दामोधर रमेश म्हस्के (वय २५)असे आहे. अल्पभूधारक शेतकरी असलेले दामोधर म्हस्के हे मागील काही दिवसापासून कर्जाच्या विवंचनेत होते. शुक्रवारी सकाळी शौचास जातो म्हणून ते शेतात गेले. त्याच ठिकाणी त्यांनी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. बराच वेळ झाला तरी शेतातून आले नाही म्हणून घरच्यांनी त्यांचा शोध घेतला असता ते गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने टेंभुर्णी येथील रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. मयत दामोधर यांचे वडील दिव्यांग असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी ते सांभाळत होते. घराचा आधार असलेल्या कर्त्या मुलानेच असे जीवन संपविल्याने आई-वडिलांच्या दुःखाला पारावार राहिला नाही.अतिशय कष्टाळू व मेहनती असलेले दामोधर म्हस्के हे घरची शेती अत्यल्प असल्याने दुसऱ्याची शेती ठोक्याने करीत होते. याबाबत टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी आदी परिवार आहे. फोटो – दामोधर म्हस्के

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे