pub-7425537887339079
ब्रेकिंग

घामाच्या धारात न्हावून निघताय विद्यार्थी आणि शिक्षक : जिल्हा प्रशासन आदेश लाल फितीत अडकले

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21

टेंभुर्णी अलनिनोच्या तीव्र सावटा मुळे यावर्षी पावसाळा लांबला आहे. सध्या मृग नक्षत्र अर्ध्यावर आले तरीही उन्हाचा पारा चाळीसच्या खाली उतरायचे नाव घेईना. त्यातच जिल्ह्यातील सर्व शाळा १५ जून पासून नियमित सुरू झाल्या. सध्या भर उन्हात १० ते ४ या वेळात शाळा भरत आहे. कडाक्याचे ऊन व कमालीचा उकाडा यामुळे सध्या जिल्ह्यातील विद्यार्थी व शिक्षक घामाच्या धारात नाहुन निघत आहे. उन्हाची तीव्रता कमी होईपर्यंत जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात अशी मागणी पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांतून होत आहे. मात्र शाळा उघडून आठवडा उलटला तरीही अद्यापही जिल्हा प्रशासन मात्र याबाबत उदासीन असून आतापर्यंत सकाळ सत्र शाळेबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने भविष्यात उन्हामुळे विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासने त्वरित जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत निर्णय घ्यावा अशी ओरड जिल्हाभर होत आहे. यावर्षी कधी नव्हे एवढा उन्हाळा तापला आहे. जिल्ह्यात सध्या कुठेही पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे अशातच ग्रामीण भागात आजही जिल्हा परिषद शाळेच्या अनेक खोल्या पत्राच्या आहेत त्यामुळे कडाकाच्या उन्हात तप्त झालेल्या या खोल्यात विद्यार्थी व शिक्षकांना बसणे असाह्य होत आहे. याशिवाय अनेक गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने शाळेत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण होत आहे. या सर्व गंभीर बाबीचा विचार करता आपत्ती व्यवस्थापनाला प्राधान्य देत जिल्ह्यातील सर्व शाळा निदान 30 जून पर्यंत सकाळ सत्रात भरवाव्यात अशी मागणी टेंभुर्णी सह परिसरातील पालक व शिक्षकातून होत आहे. चौकट – प्रशासनाने लवकर निर्णय घ्यावा ग्रामीण भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना पत्राच्या खोल्यात बसणे अवघड झाले आहे. यामुळे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना उलट्या व ताप यासारखे आजार होत आहे. याबाबत आपण जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून विद्यार्थी व शिक्षकांच्या आरोग्याच्या हितासाठी जिल्ह्यातील शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत विनंती केली आहे. प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घेऊन चांगला पाऊस पडेपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळ सत्रात भरवाव्यात. शंकर गाडेकर, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, नळविहीरा. चौकट- सध्या उन्हाळ्यापेक्षाही जास्त तापमान व उकाडा जाणवत आहे. अशातच पूर्णवेळ शाळा असल्याने विद्यार्थी व शिक्षक घामाच्या धारांत न्हावून निघत आहे. भविष्यात उष्माघात किंवा निर्जलीकरण यासारख्या गंभीर परिणामांना विद्यार्थी व शिक्षकांना सामोरे जावे लागू नाही म्हणून शिक्षक संघटनामार्फतही अर्धवेळ शाळा करणे बाबत जिल्हा प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. विशेषतः कोकणातील रायगड व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता पाहता शाळा सकाळ सत्रात भरण्याबाबत पत्र काढण्यात आले आहे. मात्र जालना जिल्हा विदर्भाला लागून असल्याने येथे कमालीचे तापमान असतानाही जिल्हा प्रशासन हा निर्णय घेण्यास टाळाटाळ का करीत आहे हेच कळत नाही. विशेष म्हणजे सकाळ सत्र शाळेत ही मध्यंतर कमी करून कामाचे पाच तास पूर्ण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कुठलेही nशैक्षणिक नुकसान होत नाही. नसीम शेख, तालुकाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटना, तालुका जाफराबाद.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे