pub-7425537887339079
ब्रेकिंग

सोनम वांगचुक यांचे दीर्घकालीन उपोषण बेदखल! – मराठवाडा शिक्षक संघाचे निवेदन!

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा पंतप्रधानांकडे मागणी!

0 4 6 3 4 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/दत्ता देशमुख,दि.17

देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ,शास्त्रज्ञ तथा पर्यावरणवादी सोनम वांगचुक दिल्ली येथे जंतरमंतरवरील दीर्घकालीन उपोषण केंद्र सरकारने बेदखल केले असून त्याबद्दल देशातील युवक, विद्यार्थ्यासह सर्व संवेदनशील नागरिकांत प्रचंड असंतोष व चिड निर्माण झाली आहे.मराठवाडा शिक्षक संघाने त्याचा निषेध केला आहे. त्यांच्या उपोषणाचा एकोणीसावा दिवस आहे. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असून त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या उपोषणाची ताबडतोब दखल घेऊन त्यांच्याशी बोलणी करावी, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम व जिल्हा सचिव गणेश आजबे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत की, अधिक माहिती अशी की, देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ,शास्त्रज्ञ तथा पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे दिल्ली येथे जंतरमंतरवर एकोणीसाव्या दिवशीही उपोषण सुरूच आहे. एका शिक्षण तज्ञाचे दीर्घकालीन उपोषण बेदखल केल्याचा मराठवाडा शिक्षक संघाने निवेदनाद्वारे निषेध केला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की,नीट पेपरफुटी ने देशातील विद्यार्थी व्यथित झाले आहेत. लाखो विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला आहे. एकोणीस विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविले ही अतिशय संतापजनक बाब आहे. या गलथानपणास केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान जिम्मेदार असल्याची देशातील विद्यार्थी-युवकांची भावना आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजिनाम्यासाठी देशातील विविध शहरात आंदोलन करून त्यांनी आपला रोष व्यक्त केला आहे. त्याची दखल न घेतल्याने जंतरमंतरवर तरूणांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. पुढे म्हटले आहे की, देशातील प्रसिद्ध शिक्षण तज्ञ,शास्त्रज्ञ तथा पर्यावरणवादी सोनम वांगचुक या विद्यार्थ्यांमागे ठामपणे उभे राहिले. या प्रश्नाकडे आपले लक्ष वेधण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाचा आज एकोणीसावा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे प्राण धोक्यात आहेत. त्यामुळे देशवासिया मधे चिंता निर्माण झाली आहे. मराठवाडा शिक्षक संघ या आंदोलनास पाठिंबा देत आहे. विद्यार्थी युवकांमधे असंतोष निर्माण झाला आहे. शिक्षणप्रेमी सोनम वांगचुक यांचे दीर्घकालीन उपोषण शासनाने बेदखल केले आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करीत आहोत. उचित दखल घेऊन सोनम वांगचुक यांच्यासह आंदोलकांशी बोलणी करावी, नीट पेपर फुटीस जबाबदार धरून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, अप्रिय घटना टाळाव्यात ही अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठवाडा शिक्षक संघाचे मार्गदर्शक पी. एस. घाडगे, व्ही.जी.पवार,अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव,सरचिटणीस राजकुमार कदम,कोषाध्यक्ष औताडे ए. बी., उपाध्यक्ष ज्ञानोबा वरवट्टे,….. प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगंपुरे प्रेमदास राठोड आर एफ कुरेशी रमेश आंधळे संजय येळवंते भीमाशंकर शिंदे जगन वाघमोडे दीपक शेरे फ रकुंद अली सय्यद नारायण मुंडे गणेश चव्हाण तुकाराम पडघन भगवान धनगे हकीम पटेल रमेश गाढे गणेश मेहेत्रे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 3 4 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे