pub-7425537887339079
ब्रेकिंग

तुपेवाडी तलावातील अवैध पाणीउपसा बंद; प्रशासनाची धडक कारवाई

0 4 9 7 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.29

बदनापूर तालुक्यातील मौजे तुपेवाडी परिसरातील तलावातून मोटार व पाइपलाइनद्वारे सुरू असलेला अवैध पाणीउपसा प्रशासनाने तातडीने बंद केला आहे. यासंदर्भात प्राप्त तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने बदनापुर तहसीलादार यांना त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार तहसीलदार बदनापूर, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) मंडळ अधिकारी, तलाठी, महावितरण विभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी सरपंच तसेच गावातील नागरिकांच्या उपस्थितीत तलावातील अनधिकृत पाणीउपसा करण्यासाठी वापरण्यात येणारा वीजप्रवाह खंडित करून पाणीउपसा तातडीने बंद करण्यात आला.यापुढे या ठिकाणी अशा प्रकारे अवैध पाणीउपसा होणार नाही, याबाबत संबंधित ग्रामपंचायत कार्यालय, स्थानिक पोलीस ठाणे आणि महावितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे तलावातील अनधिकृत पाणीउपसा रोखण्यास मदत होणार असून, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तलावातील उर्वरित पाणीसाठा सुरक्षित राहण्यास मदत होणार आहे.

ही कारवाई जिल्हाधिकारी आशिमा मित्तल तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल आणि तहसीलदार तुषार निकम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे