श्री साई सेवा मंडळ उरण विभाग तर्फे वृक्षारोपण

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.24
उरण ते शिर्डी मानाच्या पहिल्या पालखीच्या वतीने सामाजिक उपक्रम “एक झाड आई वडिलांच्या नावाने” राबविण्यात आले.एक झाड आई वडिलांच्या नावाने या संकल्पनेतून करळ ब्रीज आणि करळ फाटा ते दास्तानफाटा या पालखी मार्गावर १३५ झाडांचे रोपण करण्यात आले.याप्रसंगी भर पावसात साईभक्तांनी उत्साहात सेवा केली.साई भक्तांनी मोठ्या प्रमाणात रुक्ष दान केले.सदर कार्यक्रम लोकसहभागातून झाला याचे समाधान सर्व कमिटी मेंबर यांना झाला होता.यावर्षी मंडळ २६ व्या वर्षात प्रदार्पण करत आहे. आणि त्याच नियोजन सुरू झालं आहे. दिंड्या, आणि वाऱ्या खूप जातात पण हे मंडळ वर्षभर सामाजिक उपक्रमातून साई सेवा करत असत म्हणून मंडळाचे नाव संपूर्ण महाराष्ट्रभर आदराने घेतले जाते.अध्यात्म बरोबरच सामाजिक बांधिलकी जपत पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून राबविलेल्या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.




