वन्यजीव सप्ताह २०२६ निमित्त पुंडलिक रामा पाटील इंग्रजी माध्यम शाळा, पाणदिवे-उरण येथे फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) – सर्पमित्र निसर्ग संवर्धन संस्था, चिरनेर, ता. उरण, जि. रायगड यांच्या वतीने निसर्ग संवर्धनविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात वन्यजीवांचे निसर्गातील महत्त्व, सर्पओळख, सर्पदंशावरील प्रथमोपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसह पर्यावरणाशी संबंधित विविध गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांशी आणि उपस्थितांशी संवाद साधण्यात आला.
‘शून्य सर्पदंश मृत्यू अभियान’ हा कार्यक्रमाचा महत्त्वपूर्ण विषय होता. सापांच्या विविध प्रजातींची ओळख, सापांविषयी असलेले गैरसमज दूर करणे, सर्पदंशाच्या घटना टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि सर्पदंश झाल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. साप आणि इतर वन्यजीव हे पर्यावरणाचा समतोल राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.
याशिवाय वातावरणातील बदल, प्लास्टिक प्रदूषणाची वाढती गंभीर समस्या, भविष्यात भेडसावू शकणारी पाणीटंचाई आणि त्यावरील उपाययोजना यांविषयीही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पावसाचे पाणी साठविण्यासारख्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.
संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष जयवंत ठाकूर आणि राकेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि निसर्ग संरक्षणाची भावना रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका योगीता गुरुनाथ गावंड, प्राची प्रशांत परदेशी, हेमांगी शैलेश गावंड, स्मिता मंगेश जाधव, सुरक्षा अविनाश भोईर आणि मनाली गावंड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. वन्यजीवांचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर यांचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरला.
शिवसंकल्प समालोचक असोसिएशन उरण, रायगड. तर्फे विध्यार्थिनीस शैक्षणिक अर्थसहाय्य.
9 hours ago
मत्स्यव्यवसाय विभाग आयुक्त जे एस पटेल व उरण परवाना आधिकारी सुरेश बागुलगावे या अधिकाऱ्यांनी उरण दिघोडे येथील घटनास्थळी भेट देऊन केली नुकसानाची पाहणी
9 hours ago
आ. महेश बालदी यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करण्याच्या मागणीसाठी १ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयावर निघणार महाविकास आघाडीचा मोर्चा.
9 hours ago
राज्यस्तरीय शालेय सेपाकटाकरा स्पर्धेत 17 वर्षाखालील मुलींची चमकदार कामगीरी; संघाला तृतीय स्थान श्रुती मांटे ची राष्ट्रीय संघात निवड
9 hours ago
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजपा जालना महानगर च्या वतीने अभिवादन
9 hours ago
समतेचा विचार, शिक्षणाचा ध्यास आणि माणुसकीचा अखंड प्रकाश—- चित्रकार संतोष औटी महामानव क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन
1 day ago
जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे दिव्यांग,वृध्द, निराधाराना न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत शेकडो दिव्यांग धरने आंदोलनात सहभागी
1 day ago
गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवेला प्राधान्य; तीन महिन्यांनी पुन्हा घेणार कामाचा लेखाजोखा! – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री प्रकाश आबिटकर
1 day ago
निवृत्तीवेतनधारकांनी 31 डिसेंबरपर्यंत हयातीचे प्रमाणपत्र सादर करावे
1 day ago
संविधान दिनानिमित्त जालना येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन