pub-7425537887339079
ब्रेकिंग

स्वर्गीय अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; नागरिकांना रक्तदानाचे आवाहन.

0 4 7 1 0 1
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि 25

उरणचे उत्तम खेळाडू स्वर्गीय अश्विन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत अश्विन पाटील मित्र परिवारच्या माध्यमातून श्री साई ब्लड बँक, पनवेल यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत श्री. मा. बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, उरण शहर येथे होणार आहे. “रक्ताचा आहे थेंब थेंब मौल्यवान, याची असावी सर्वांना जाण; म्हणूनच करावे रक्तदान” या सामाजिक संदेशातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ सामाजिक कार्य असून, आपल्या एका रक्तदानामुळे गरजू रुग्णाचे प्राण वाचण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या उपक्रमात युवकांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहन करण्यात आले आहे.या सामाजिक उपक्रमाचे आयोजक अश्विन पाटील मित्र परिवार असून, वाढदिवसा निमित्त दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. रक्तदान शिबिराच्या अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क : तुषार पाटील : ८९७६७४६४७४, गणेश पाटील : ९८३३००१३९३, पप्पू सूर्यराव : ९८२१६२५३६२, सागर मसुरकर : ९६९९२६७३५५, मयुरेश पाटील : ८८५०१९९३७३, कौशिक भोईर : ९८९२८६९२९१

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 1 0 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे