सुरंगली येथे भारत रत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी

भोकरदन/संजीव पाटील,दि.15
भोकरदन तालुक्यातील सुरंगली येथे भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अँड एफ.एच.सिरसाठ,शेख.एजाज , माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरित्र वर उपस्थितांशी सवांद साधला कार्यक्रमास माजी उपसरपंच विनोद सेठ जाधव , संतोष काळे, माजी उपसरपंच एकनाथ भराड,भाऊ साहेब काळे, राहुल जाधव, माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील, पोलिस उपनिरीक्षक गणेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. विनोद जाधव, माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील, संजय तुकाराम दांडगे पोलिस पाटील,संतोष काळे, प्रमोद सेठ जाधव ,भाऊसाहेब काळे एकनाथ भराड शेख रुबाब भै, दादा राव दांडगे, लाईन मन काशीनाथ दांडगे , यांनी डॉ.बाबासाहेब यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पुजन केले.यावेळी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. माजी सरपंच पत्रकार संजीव पाटील यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी, दिनकर भिवा गवळी,महा वंदना घेण्यात आली भिमराव दगडु गवळी, कैलास गजेंद्र गवळी, अरुण गवळी, दिपक गवळी,निरंजन गवळी,कृष्णा गवळी.अरुण तेजराव गवळी, घनश्याम बोर्डे, मधुकर गवळी, राजीव गवळी, भिमराव गणपती गवळी, भगवान गवळी, समाधान गवळी,नाना गवळी, वसंता गवळी, नंदु रामदास जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य सौ.अंतीका बाई तेजराव गवळी, सौ.शोभाबाई बोर्डे, श्रीमती इंदुबाई बनकर, सौ.निताताई अरुण गवळी जिल्हा परिषद शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांच्या सह अनेक महीला पुरुष कार्यक्रम उपस्थित होते. संध्याकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची गावातुन मिरवणूक काढण्यात आली. उपरोक्त कार्यक्रम मिरवणूक सह शांततेत पार पडले.
