ब्रेकिंग
माहोरा येथे बकरी ईद उत्साहात साजरी, नमाज अदा करून दिला ऐक्याचा संदेश

0
4
3
8
7
0
टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.28
माहोरा येथे ईद-उल-अजहा (बकरी ईद) निमित्त मुस्लिम बांधवांनी मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात नमाज अदा केली. सकाळी मशिदींमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव उपस्थित राहून नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत बंधुभाव आणि ऐक्याचा संदेश देण्यात आला. यावेळी शांतता व सुव्यवस्था राखण्यात आली ईद-उल-अजहाच्या निमित्ताने समाजात प्रेम, शांतता आणि भाईचाऱ्याचा संदेश देत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. बकरी ईद हा इस्लाम धर्मातील दुसरा सर्वात मोठा सण आहे. रमजान ईदनंतर सुमारे 70 दिवसांनी येतो. याला “ईद-उल-अधा” म्हणजे “त्यागाची ईद” असेही म्हणतात.
0
4
3
8
7
0




