pub-7425537887339079
ब्रेकिंग

दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे माझे कर्तव्य : महेंद्रशेठ घरत

शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जतच्या विद्यार्थ्यांना दफ्तर-छत्रीचे वाटप

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.15

“दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांची वानवा असते. त्यामुळे अशा शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक मदत करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे दफ्तर, छत्री यांसारख्या प्राथमिक सुविधा देण्याचा गेली १५ वर्षे मी सातत्याने प्रयत्न करीत आहे. कर्जत तालुक्याशी आपले वेगळे नाते आहे ,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी कर्जत येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. पनवेल तालुक्यातील शेलघरच्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेतर्फे कर्जत येथील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दफ्तर आणि छत्रीचे मंगळवारी (ता. १४) वाटप करण्यात आले. कर्जत येथील रायगड जिल्हा परिषदेच्या खांडस, तुंगी, आंबेरपाडा, काठेवाडी, तेथील अंगणवाडी आदी सहा शाळांतील ३५० विद्यार्थ्यांना यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत, शुभांगीताई घरत यांच्या वतीने हे शैक्षणिक दान करण्यात आले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांचे कुटुंबीय हिरीरीने सहभागी झाले होते. यावेळी कर्जतच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनीही भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले, “महेंद्रशेठ घरत यांच्यासारखे दानशूर समाजात आहेत, याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. दरवर्षी आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून ते विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलत आहेत.” यावेळी राम म्हात्रे, वासंती म्हात्रे, गुलाबशेठ घरत, ललिताताई घरत, श्रीकांत घरत, मिनाक्षी घरत, शकुंतलाताई ठाकूर, बानुबाई भगत, यशवंत ढोंगे आणि एम. जी. ग्रुपचे सहकारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे