pub-7425537887339079
ब्रेकिंग

विशेष सखोल पुनरीक्षण अभियानात जालना जिल्ह्याचा राज्यात ठसा

• मतदार यादीतील मॅपिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव

0 4 6 1 8 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.15

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण अभियानांतर्गत सन 2002 पूर्वीच्या मतदार यादीतील मतदारांची नावे सध्याच्या मतदार यादीशी मॅपिंग करण्याचे काम पूर्ण झाले असून, जालना जिल्ह्याने या अभियानात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या उत्कृष्ट कार्याबद्दल मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व त्यांच्या पथकांचा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. भारत निवडणूक आयोगाने 14 मे 2026 रोजी जाहीर केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमानुसार महाराष्ट्रासह 16 राज्ये व तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये हे अभियान राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमानुसार 30 जून ते 29 जुलै 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरभेटी देऊन मतदारांना गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप, अर्ज भरण्यास सहाय्य व डिजिटायझेशनची प्रक्रिया राबवत आहेत. जालना जिल्ह्यात 16 लाख 82 हजार 723 मतदार असून आतापर्यंत 13 लाख 54 हजार 924 मतदारांचे मॅपिंग पूर्ण झाले असून त्याची टक्केवारी 80.52 आहे. यामध्ये 99-परतूर मतदार संघात 3 लाख 30 हजार 377 मतदारापैकी 2 लाख 87 हजार 310 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 86.96 आहे. 100-घनसांगवी मतदारसंघात 3 लाख 28 हजार 606 मतदारापैकी 2 लाख 99 हजार 535 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 91.15 आहे. 101-जालना विधानसभा मतदारसंघात 3 लाख 58 हजार 637 मतदारापैकी 2 लाख 3 हजार 398 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 56.71 आहे. 102-बदनापूर मतदारसंघात 3 लाख 38 हजार 936 मतदारापैकी 2 लाख 86 हजार 409 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 84.50 आहे. 103-भोकरदन मतदारसंघात 3 लाख 26 हजार 167 मतदारापैकी 2 लाख 78 हजार 272 मतदाराची मॅपींग पूर्ण झाली असून त्याची टक्केवारी 85.32 आहे. अभियानाच्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता दिनांक निश्चित करण्यात आला असून, 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जातील, तर अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदार मॅपिंगचे काम प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या बीएलओंचा आज सत्कार करण्यात आला. या अभियानात परतूर, घनसावंगी, जालना, बदनापूर आणि भोकरदन विधानसभा मतदारसंघातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंना गौरविण्यात आले. या सत्कारमूर्तीमध्ये शरद मुंढे, सुनिल गवई, श्रीमती कालिंदा दवंडे, श्रीराम बहीर, मुकेश गाडेकर, बी. आर. वाघमारे, रमेश मान्टे, श्रीमती शिवगंगा बारगाजे, दिपक मोहिते, शिवाजी ठाकूर, ए. पी. इंगळे या बीएलओंचा समावेश आहे. मतदार यादी अद्ययावत, अचूक आणि पारदर्शक करण्याच्या दृष्टीने विशेष सखोल पुनरीक्षण अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 8 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे