pub-7425537887339079
ब्रेकिंग

आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली विजय भोईर यांची महावितरणकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16

उरण तालुक्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होणे व व्होल्टेजमध्ये सतत चढ-उतार होत असल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय राजाराम भोईर यांनी महावितरण प्रशासनाकडे उपस्थित केला आहे. उरणचे आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्यकारी अभियंता, महावितरण उरण विभाग यांना निवेदन दिले. या निवेदनात वारंवार होणाऱ्या वीज खंडिततेमुळे घरगुती विद्युत उपकरणांचे नुकसान होत असल्याने तातडीने दुरुस्ती व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विद्युत यंत्रणेची तपासणी करून संभाव्य अपघात टाळावेत, तसेच नुकसानग्रस्त ग्राहकांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी करण्यात आली. दरम्यान, या संदर्भातील निवेदन ऊर्जा विभागाच्या मंत्र्यांनाही ई-मेलद्वारे पाठविण्यात आले असून उरणकरांना सुरक्षित, दर्जेदार व अखंडित वीजपुरवठा मिळावा, अशी अपेक्षा विजय भोईर यांनी व्यक्त केली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे