सावरगाव म्हस्केतून शेतकरी प्रश्नांवर संघर्षाचे रणशिंग
जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष उभारण्याचा निर्धार जाफ्राबाद तालुक्यातील सावरगाव म्हस्के येथे १४ ऑगस्ट रोजी करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष मयुर रामेश्वर बोर्डे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी, युवक व कार्यकर्ते एकवटले असून, आगामी काळात शेतकरी प्रश्नांवर आक्रमकपणे आवाज उठविण्याचा संकल्प करण्यात आला. युवा प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मयुर बोर्डे यांचा ग्रामस्थांच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. यावेळी युवक, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांच्या नेतृत्वामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.
सत्काराला उत्तर देताना मयुर बोर्डे यांनी शेतकरी प्रश्नांसाठी मिळालेले पद ही जबाबदारी असल्याचे सांगितले. शेतमालाला
योग्य भाव, वाढता उत्पादन खर्च, वीज व पाण्याचे प्रश्न, कर्जबाजारीपणा तसेच शासन दरबारी प्रलंबित मागण्यांसाठी संघटित लढा उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सावरगाव म्हस्के येथून सुरू झालेली शेतकरी चळवळ जाफ्राबाद तालुक्यातील गावागावात पोहोचविण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. निवेदने, आंदोलने, मोर्चे तसेच अन्य लोकशाही मार्गांचा अवलंब करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे सांगण्यात
आले. शेतकरी चळवळीत युवकांचा सहभाग वाढविण्यावरही भर देण्यात आला.
कार्यक्रमास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुदाम शेवत्रे, पक्षाचे तालुका अध्यक्ष समाधान गाढवे, आकाश मुरकुटे, गणेश मुरकुटे, भीमराव राऊत, रामदास शेवत्रे, उत्तम जाधव, सम ाधान गायकवाड, रामदास नेवरे यांच्यासह सावरगाव म्हस्के येथील शेतकरी, युवक, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

