pub-7425537887339079
ब्रेकिंग

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद येथे जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने शपथ

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.29

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग – जिल्हा समाज कल्याण कार्यालय, जिल्हा परिषद नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, सहारा सामाजिक विकास संस्था, तेजस जनविकास संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक तंबाखु विरोधी दिनानिमित्ताने जिल्हा परिषद येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकारी, कर्मचारी यांना तंबाखु मुक्तीची शपथ देण्यात आली यावेळी- नशा मुक्त भारत अभियांनाची या कार्यक्रमात नशाबंदी मंडळाच्या वतीने पोस्टर प्रदर्शने करण्यात आले. जिल्हा संघटक तथा सहारा संस्थेचे अध्यक्ष बिस्मिल्ला सय्यद यांनी तंबाखू विरोधी दिनाचे महत्त्व अधोरेखित करुन तंबाखूचे दुष्परिणाम व व्यसनामुळे होणाऱ्या गंभीर आजार विषयी माहिती दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमाचे संचलन तेजस जनविकास संस्थेचे अध्यक्ष शिवाजी तायडे यांनी केले तर आभार समाजकल्याणचे राम मांटे यांनी व्यक्त केले. समाज कल्याण विभागाचे सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे