pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यीनीची शासकीय सेवेत निवड.

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 6

जाफराबाद येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची विज्ञान शाखेची विद्यार्थिनी कु.प्राची सुनील मेढे हिची बॅक ऑफ बडोदाच्या प्रोबेशनरी ऑफिसर पदी निवड तर कु.निकिता सिताराम हिवाळे हिची पोलिस काॅन्सटेबल पदी निवड झाली आहे त्या निमित्ताने सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.दादासाहेब म्हस्के यांच्या शुभहस्ते दोन्ही विद्यार्थीनीचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमा प्रसंगी बोलताना दादासाहेब म्हस्के म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सेवेसाठी आमची संस्था व महाविद्यालय सदैव विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे.विद्यार्थांच्या सर्वप्रकारच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असल्याचेही सांगितले.आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत हे ही दादासाहेबांनी बोलताना सांगितले.या कार्यक्रमा प्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो. डॉ.सुनील मेढे, उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे,प्रा.पी व्ही राजपुत,प्रा.शिवाजी वैद्य श्री.संदीप जाधव, कौतिक पंडित, अशोक फदाट, साहेबराव संसारे,धनराज भिसे, दिलीप घुगे,कैलास पवार,विकास भापकर, आण्णासाहेब घोडके व महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी बंधु-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा.अनिल वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.विनोद हिवराळे यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे