झाडावर प्रेम करणे म्हणजे आईवर प्रेम करण्यासारखेच आहे. – साहित्यरत्न प्रा. एल.बी.पाटील.
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.14
वृक्षावर प्रेम करणे म्हणजे आपल्या आईवर प्रेम करण्यासारखेच आहे.तरी ते प्रेम वृक्ष लावून करू या.असा विचार कोकण मराठी साहित्य परिषद (को. म. सा. प)विश्वस्त साहित्यरत्न रायगडभूषण प्रा. एल. बी.पाटील यांनी उरण एस. टी.डेपो येथे वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डेपो व्यवस्थापक बेंद्रे होते. यावेळी जे एन पी ए चे माजी वित्त अधिकारी महादेव घरत आपल्या भाषणात म्हणाले की वृक्षारोपण ही समाजाने समाजासाठी करायची सेवा आहे.अशा सेवेसाठी बोलाविल्या बद्दल डेपो व्यवस्थापक यांचे आभार मानले. अध्यक्ष बेंद्रे यांनी आपल्या प्रास्ताविकात कर्मचाऱ्यांच्या उत्साही सहभागामुळे असे कार्यक्रम यशस्वी होत आहेत.यावेळी समाजसेविका अनुताई पाटील,सायली पाटील,तानाजी भोईर,संजय पाटील आणि एस टी डेपो कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती. त्यानंतर डेपो परिसरात १०० झाडे लावण्याचा उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.




