दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जांब बु. ग्रामपंचायत सभागृहात बैठक संपन्न
दिव्यांगासाठी जिल्हाधिकारी यांनी १२ बैठका, १ सुनावणी तरी प्रश्न जैसे थे; १५ दिवसात निवेदनातील उत्तर देऊन न्याय हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत ग्रामपंचायतीत बेमुदत धरणे आंदोलनाचे निवेदन देऊन संघर्षात दिव्यांग बांधवानी सहभागी व्हा - चंपतराव डाकोरे पाटील

नांदेड/ प्रतिनिधी,दि.8
दिव्यांग, वृद्ध निराधार मित्र मंडळ महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील (कुंचेलीकर) यांच्या अध्यक्षतेखाली जांब बु. परिसरातील दिव्यांग बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहण्याचा सत्कार, सन्मान करण्यात आला.
प्रस्तावित गणपतराव गौड यांनी दिव्यांग, वृध्द निराधार बांधवाना न्याय हक्क मिळावा म्हणून मा. डाकोरे पाटील करीत असलेल्या चळवळीमुळे दिव्यांगाना न्याय हक्क मिळत असल्यामुळे आपण सर्वांनी आपल्या गावात संघटनेची शाखा आहे पण बोर्ड नसल्यामुळे शाखा बोर्ड लवकरच करण्याबाबत विचार मांडतात सर्वानी टाळ्या वाजवून संमती दिली लवकरच बोर्डाचे अनावरण करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला.
मनोहर येरपुरवार यांनी आपले मनोगतात दिव्यांगाना न्याय हक्क मिळावा म्हणून मा. चंपतराव डाकोरे पाटील यांनी ग्रामपंचायत पंचायत अंतर्गत जे दिव्यांग बांधवाचे प्रश्न सुटत नसल्यामुळे गावपातळीवर ग्रामसेवक यांना निवेदनद्वारे नऊ प्रश्नाचे
वाचन करुन दाखविले व आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना निवेदन देण्याचा निर्णय घेतला असेच निवेदन नांदेड जिल्ह्यातील सर्व गावा गावातुन दिव्यांग बांधवानी देऊन लढाई सहभागी होण्याचे आव्हान केले.
अध्यक्षिय समारोप संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवानी अनेक सवलतीची माहिती दिली आपल्या संघटनेच्या वतीने शासन, प्रशासन जागे करण्यासाठी अनेक आंदोलनात आपण सहभागी झाल्यामुळे अनेक सवलती मिळत अनेक सवलती मिळाव्यात म्हणून
संघटनेच्या वतीने पाठ पुराव्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिव्यांगांच्या प्रश्नांबाबत १२ बैठका आणि १ सुनावणी घेऊनही आदेश, निर्देश देऊन प्रश्न ‘जैसे थे’ असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निष्काळजी अधिकाऱ्यांवर दप्तर दिरंगाई कायदा आणि दिव्यांग कायद्यानुसार कारवाई करण्याची आक्रमक मागणी डाकोरे पाटील यांनी केली.
या बैठकीत दिव्यांगांच्या प्रशासकीय छळाविरुद्ध नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांना निवेदन देण्याचा आणि निवेदनातील मागण्यांवर १५ दिवसात लेखी उत्तर न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आला.
*ग्रामपंचायतीकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या :*
१) दिव्यांग कायदा २०१६ ची माहिती देण्यासाठी किती वेळा ग्रामसभा किंवा बैठक घेतली? त्याची रजिस्टर प्रतिसह माहिती देणे.
२) ग्रामपंचायतीकडील दिव्यांग प्रमाणपत्र नंबर व मोबाईल नंबर नोंद रजिस्टरची माहिती देणे.
३) सन २०१६ पासून आजपर्यंत दिव्यांगांसाठी राखीव ५% निधी किती वेळा वाटप केला? लाभार्थी, सही, वस्तू, रक्कम व मोबाईल नंबरसह रजिस्टर माहिती देणे.
५) रो.ह.यो. मध्ये काम देता येत नसेल तर १०० दिवसांचा भत्ता किती दिव्यांगांना मिळाला? त्याची माहिती देणे.
६) किती दिव्यांगांना घरकुल दिले? घरकुलासाठी किती प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवले? याबाबत बैठक घेतली का? याची माहिती देणे.
७) शासनाच्या विविध विभागांत दिव्यांगांसाठी असलेल्या ५% राखीव आरक्षणातून किती दिव्यांगांना लाभ मिळाला? त्याची माहिती देणे.
८) दिव्यांगांना व्यंगावरून बोलणे, मानसिक/शारीरिक त्रास देणे, घरावर-शेतीवर अतिक्रमण केल्यास दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ नुसार गुन्हा दाखल होतो, याची माहिती दिली का? त्याची माहिती देणे.
९) बूथवर जाऊन मतदान करू न शकणाऱ्या दिव्यांगांसाठी घरोघरी मतदानाची सुविधा व नोंदणीबाबत माहिती दिली का? त्याची माहिती देणे.
वरील माहितीचे १५ दिवसांत समाधानकारक लेखी उत्तर व कृती न झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणि जिल्हाधिकारी दालनात स्वेच्छामरणाच्या परवानगीसाठी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा गावागावातून निवेदनाद्वारे देण्यात यावा, असे डाकोरे यांनी बैठकीत सांगितले.
या बैठकीस मा. मनोहरराव येरपुरवार, गणपत गौड सातोळे सोमनाथ सातोळे बाबासाहेब सोनकांबळे, दत्तात्रय आंदे,आत्माराम मोरे,
तेजेराव शिकारे,गणपत मोरे, मोहन काशिनाथ, चंद्रकांत वंजे,महानंदा व्यंकटी, लक्ष्मण लांडगे, लता आंदे ईत्यादी
कार्यकर्ते उपस्थित होते.
.

