pub-7425537887339079
ब्रेकिंग

फत्रकारावरील हल्ल्याचा जाफराबाद तालुका पत्रकार संघाकडून निषेध

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5

जालना येथील पत्रकार संतोष भुतेकर यांच्यावर जालना येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाने तीव्र निषेध केला. या प्रकरणातील दोषींना तातडीने अटक करावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी तहसीलदार तसेच पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. अध्यक्ष मुकेश दुलमसिंग भारद्वाज यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार मंगेश साबळे यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. समाजातील समस्या, जनहिताचे प्रश्न, शासन-प्रशासनाच्या कामकाजावर प्रकाश टाकण्याचे काम पत्रकार करतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे संघाने स्पष्ट केले. प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली. दोषींना तात्काळ अटक करावी, असेही म्हटले. भविष्यात अशा घटना घडू नयेत. यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे