pub-7425537887339079
ब्रेकिंग

सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य उपक्रम

0 5 3 6 3 6
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.13
छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास आणि गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व नव्या पिढीला समजावे, तसेच मुलांमध्ये इतिहासाविषयी आवड आणि जिज्ञासा निर्माण व्हावी, या उद्देशाने सारडे विकास मंचाच्या वतीने दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीत किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदाही आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, तब्बल ६८ किल्ल्यांची नोंदणी करण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे प्रितेश कोळी, अभिषेक ठाकूर आणि अक्षय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व किल्ल्यांचे परीक्षण व निरीक्षण करण्यात आले. स्पर्धेमध्ये मुलांनी आपल्या कल्पकतेचा, कलाकौशल्याचा आणि ऐतिहासिक जाणिवेचा सुंदर आविष्कार सादर केला.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक किल्ले रायगड साकारल्याबद्दल राज महेश घरत याने पटकावला. द्वितीय क्रमांक मुरुड-जंजिरा किल्ल्यासाठी स्वाद घनश्याम पाटील याला मिळाला. तर उत्तेजनार्थ पारितोषिके अजिंक्यतारा किल्ल्यासाठी ईशान निलेश म्हात्रे आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासाठी मोहित मिलन माळी यांना प्रदान करण्यात आली. विजेत्यांना बक्षिसे आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व ६८ स्पर्धकांना नानोशी, पनवेलचे सरपंच विनंती मोहन पाटील यांच्या वतीने भेटवस्तू देऊन प्रोत्साहनपर गौरविण्यात आले. त्यामुळे सहभागी बालस्पर्धकांचा उत्साह द्विगुणित झाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसाद पाटील (माजी सरपंच, वशेणी), निवास गावंड (सुयश क्लासेस, आवरे), रविंद्र पाटील (माजी उपसरपंच, कळंबुसरे), ॲड. रनिता ठाकूर, आदर्श शिक्षक उपेंद्र ठाकूर, कॉमेडी कलाकार रोशन घरत, गजानन ठाकूर, कृषिमित्र प्रकाश माळी, हॉटेल एम.डी.एस.चे मालक नितीन म्हात्रे, हरिश्चंद्र म्हात्रे, श्री गणेश फर्निचरचे मालक विनोद पाटील, गणेश पाटील, अमोल पाटील, सिद्धेश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲड. रनिता ठाकूर यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतन पाटील (खोपटे) यांनी प्रभावीपणे केले. याप्रसंगी निवास गावंड सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, “सारडे विकास मंच ही एक आदर्श संस्था असून, अशा संस्थेचा आपण एक भाग आहोत, याचा आम्हाला मनापासून अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
किल्ले स्पर्धेसाठीची बक्षिसे रविंद्र पाटील (माजी उपसरपंच, कळंबुसरे), प्रा. अनिल नायडू, प्रशांत म्हात्रे आणि विनायक म्हात्रे यांनी दिली. तर स्पर्धकांसाठी खाऊची व्यवस्था हरिश्चंद्र म्हात्रे, गणेश पाटील आणि नितीन म्हात्रे यांनी केली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लहानग्यांनीही मोलाचे योगदान दिले. किल्ल्यांची नावनोंदणी आणि फोटोग्राफीची जबाबदारी रिया म्हात्रे, नील म्हात्रे, अक्षता, निरव म्हात्रे, राजेश पाशी, सारा म्हात्रे आणि विभा म्हात्रे या बालचमूने उत्साहाने पार पाडली. तसेच प्रकाश माळी, विनोद पाटील, अमोल पाटील, सिद्धेश पाटील आणि हरिश्चंद्र म्हात्रे यांनी विशेष मेहनत घेत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले.
शेवटी सारडे विकास मंचचे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे यांनी उपस्थित मान्यवर, स्पर्धक, पालक आणि आयोजनासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
इतिहासाची ओळख, गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि बालकांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा सारडे विकास मंचाचा हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 3 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे