वाळू उपशाला केला विरोध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

केदारखेडा/प्रतिनीधी,दि.25
पिंपळगाव सूळ शिवारातील पूर्णा नदीपात्रात असलेल्या स्वतःच्या मालकीची विहिरीजवळून वाळू उपसा करू नका, असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यास वाळू माफियांनी काठीने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी भोकरदन ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदारखेडा येथील शेतकरी कृष्णा गंभीरराव जाधव यांच्या गट नं. २१२ मधील शेतालगत विहीर आहे. विहिरीजवळ सुरू असलेला वाळू उपसा रोखण्यासाठी बुधवारी जाधव हे गेले होते. तेथेच त्यांना माफियांनी काठीने मारहाण करून जेसीबी अंगावर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भोकरदन पोलिसांत संशयित सहदेव अण्णा तांबडे, नकुल अण्णा तांबडे (रा. मेरखेडा), कृष्णा मधुकर ठोंबरे (रा. जवखेडा ठोंबरे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संबंधित वाळु माफियांना अटक करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनामा तलाठ्यांनी केला आहे. वाळू उपशाकडे दुर्लक्ष केदारखेडा, मेरखेडा, पिंपळगाव सूळ, बामखेडा, जवखेडा ठोंबरे आदी गावांव्या परिसरातील पूर्णा नदीपात्रातून गेल्या २ महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. भरदिवसा सुरू असलेल्या अवैद्य वाळू उपशाकडे महसूल व पोलीस यंत्रणा हेतू पुरस्कार दुर्लक्ष करत असल्याने वाळू माफियांची मुजोरी वाढली आहे. महसूलवे अधिकारी आणि कर्मवाऱ्यांवे वाळू माफियांशी लागेबांधे असल्याची चर्चा सुरू आहे. रस्त्यालगतच मोठमोठे साठे वाळू माफियांनी केदारखेडा ते बोरगाव तारू, केदारखेडा ते वामखेडा, मेरखेडा फाटा ते मेरखेडा गाव, जवखेडा फाटा ते जवखेडा ठोंबरे गाव, समर्थनगर रस्ता नळणी या मुख्य रस्त्यालगत मोठमोठे अवैध वाळूचे साठे केलेले असतानाही त्याकडे महसूल यंत्रणा कानाडोळा करताना दिसत आहे. हे अवैध वाळू साठे नेमके कोणाव्या आशीर्वादाने होत आहे? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.




