pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबाद तालुक्यातीलजवखेडा ढेंग येथे राम चरित्र चिंतन कथेचे आयोजन

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4

जाफराबाद तालुक्यातील जवखेडा ठेंग येथील श्री जनेश्वर महादेव मंदिर तथा श्री राष्ट्रसंत सगुरू जनार्दन स्वामी गोसेवा आश्रम येथे श्री राम चरित्र चिंतन कथेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा आध्यात्मिक ज्ञानयज्ञ दिनांक ४ ते १० जून या कालावधीत संपन्न होणार असून परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पवित्र कथामालेसाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील प्रसिद्ध कथाकार हभप. श्री भाऊ पाटील हे कथाचार्य म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. श्रीराम चरित्रातील आदर्श, भक्ती, धर्म आणि संस्कार यांचे चिंतन करून भाविकांना अध्यात्माची गोडी लावण्याचे कार्य या कथेमार्फत होणार आहे. या कार्यक्रमास शितल संत परमपूज्य श्री महेशगिरीजी बाबा, स्वरसम्राट परमपूज्य श्री राघवगिरीजी बाबा तसेच परमपूज्य श्री ज्ञानेश्वर माऊली (श्री ज्ञानेश्वर आश्रम, जवखेडा) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या आशीर्वचनांमुळे आणि मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शोभा अधिक वाढणार आहे. सप्ताहभर दररोज भजन, कीर्तन, प्रवचन आणि चालणाऱ्या या कथेमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून या आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन श्री जनार्दन स्वामी भक्त मंडळाच्या भोकरदन, जाफ्राबाद शाखेच्यावतीने करण्यात आले आहे. संपूर्ण परिसरातील रामभक्त आणि श्रद्धाळू नागरिकांनी या कथासोहळ्यास उपस्थित राहून धर्म, संस्कार आणि अध्यात्माचा लाभघ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे