pub-7425537887339079
ब्रेकिंग

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या थेट कर्ज योजनेसाठी 8 एप्रिल रोजी लॉटरी

0 4 0 5 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.2

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय जालना यांच्या वतीने सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी राबविण्यात येत असलेल्या थेट कर्ज योजनेच्या लाभार्थ्यांची निवड आता लॉटरी पद्धतीने (चिठ्ठी टाकून) केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया बुधवार दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथे पार पडणार आहे.
या आर्थिक वर्षासाठी जालना जिल्ह्याला एकूण 24 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. या योजनेसाठी महामंडळाकडे एकूण 166 उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अर्जांच्या छाननीनंतर त्यापैकी 119 अर्जदार पात्र ठरले असून, 47 अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा लाभार्थी निवड समिती यांच्या अध्यक्षतेखाली ही लॉटरी प्रक्रिया राबविली जाईल. निवड प्रक्रियेत पूर्णतः पारदर्शकता राहावी यासाठी ही विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने सर्व पात्र अर्जदारांना या निवड प्रक्रियेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेद्वारे पात्र 119 उमेदवारांमधून चिठ्ठी टाकून अंतिम 24 लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे. असे जिल्हा व्यवस्थापक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 5 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे