महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, गाय/म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
जालना/प्रतिनिधी,दि.16
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र एमसीईडीद्वारे जालना येथे पशुसंवर्धनावर आधारित शेळीपालन कुक्कुटपालन दुग्धव्यवसाय गाय/ म्हैसपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे दि. 20 जुलै,2026 ते 25 जुलै, 2026 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. सुशिक्षित बेरोजागार युवक-युवती व महिलांनी उद्योग व्यवसाय क्षेत्राकडे वळून स्वतःचा स्वयंरोजगार निर्माण करावा. हा या प्रशिक्षण कार्यक्रम आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. या प्रशिक्षणामधून प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगाराबाबत उपलब्ध बंदीस्त शेळीपालनः शेळीपालनाची सद्य स्थिती, शेळ्यांच्या विविध जाती निवड, आदर्श गोठा, शेळ्याचे प्रमुख आजार व लक्षणे प्रतिबंधक उपाय व उपचार शेळ्याचे संतुलित आहार, गाभण शेळ्याचे व करड्याचे संगोपन इ. सखोल मार्गदर्शन या शिवाय उद्योजकता प्रशिक्षण ज्यामध्ये उद्योजकीय प्रेरणा व गुणसंपदा, कौशल्य विकास व स्वयं मुल्यांकन (मी कोण आहे) उद्योग उभारणी विविध टप्पे, आपल्या कामासाठी कुठे संपर्क करावा, उद्योग व्यवसायाची निवड, उद्योग संधी, उद्योग व्यवस्थापन, बाजार पेठ व्यवस्थापन, मार्केटिंग व संभाषण कौशल्य, विविध कार्यालय व महामंडळांच्या कर्ज विषयक माहिती, राष्ट्रीय कृत बँका नाबार्ड, यांचे कार्य व योजनांविषयी माहिती लघु उद्योग नोंदणी कर्ज व सादरीकरण व प्रक्रिया, उद्योग संदर्भात कायदे, शासकीय कर्ज योजनांची माहिती व सवलती इत्यादी बाबत तज्ञ व अधिकारी वर्गामार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. कार्यक्रमासाठी प्रशिक्षणार्थी हा किमान 7 वी वर्ग पास व 18 ते 50 वयोगटातील असावा तसेच स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करण्याची प्रबळ इच्छा असावी. तरी इच्छुकांनी प्रवेश अर्ज व अधिक माहितीसाठी दि.20 जुलै,2026 पूर्वी, कार्यक्रम समन्वयक वैशाली कुलकर्णी, मो.7350418492 संपर्क महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एमसीईडी) जिल्हा उद्योग केंद्र द्वारा-मराठा पार्क बिल्डिंग, विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) चौफुली, जालना. फोन.नं.02482-220592 येथे संपर्क करण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एमसीईडी विनोद तुपे, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.




