तांबेकर सरांचा अमृत महोत्सव वाढदिवस साजरा करताना झाडे जगवा हा संदेश

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.5
टेंभुर्णी येथील प्रसिद्ध कवी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, समाजसेवेला वाहून घेणाऱ्या, साहित्य क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या लेखक म्हणून ज्यांच्या हातात पेन असतो, अशा जालनारत्न पुरस्कार प्राप्त तांबेकर सरांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करताना झाड देऊन वाढदिवस साजरा केला त्या वाढदिवसाच्या निमित्ताने संदेश तांबेकर सरांनी दिला की झाडे जगवा देश वाचवा, झाडांपासून मिळणाऱ्या सर्व फायद्यांचा विचार करा आणि आत्तापासूनच झाडे लावण्याला प्रारंभ करा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना तांबेकर सरांनी मोलाचा संदेश दिला असून भविष्यात येणाऱ्या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी संयम ठेवा आणि दुष्काळाला सामोरे जा असाही संदेश त्यांनी आपल्या सर्व शुभेच्छांना दिला. याप्रसंगी नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक तथा शांतता कमिटीचे सदस्य विश्वनाथ सांगोळे सर, प्रेस कन्सिल ऑफ महाराष्ट्राची जाफराबाद तालुका अध्यक्ष शेख अशपाक, वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष तथा नवभारत शिक्षण संस्थेचे संचालक, तथा शिवराम पाटील प्रतिष्ठानचे कार्यकारी सचिव प्राध्यापक दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर, प्रसिद्ध चित्रकार तथा कवी लेखक संतोष बाबुरावऔटी यांनी त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा केला. त्यांना एक झाड ही प्रेझेंट देण्यात आले. त्या झाडाच्या संदेशावरूनच तांबेकर सरांनी लोकांना दुष्काळाच्या झळा पोहोचू नये म्हणून आतापासूनच झाडे लावण्याचा सल्लाही दिला. यावर्षी पर्जन्यमान कमी आहे त्यापासून होणाऱ्या दुष्काळाच्या झळा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होतील हेही त्यांनी आपल्या लोकांना सांगितले. त्यांनी जनतेला आव्हान केले की या दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी आपल्यामध्ये संयम ठेवा त्याचबरोबर दुष्काळाला सामोरे जाताना अनेक समस्या निर्माण होतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करा यामध्ये अनेक सामाजिक संस्थानी पुढाकार घेतला पाहिजे. सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला
पाहिजे.तरुण मंडळींनी सुद्धा पुढाकार पुढाकार घेतला पाहिजे. असे सुद्धा आव्हान त्यांनी आपल्या या भाषणामध्ये केले. याप्रसंगी वेध रायगडाचा प्रतिष्ठान महाराष्ट्राचे प्रांत अध्यक्ष दत्ताजीराव देशमुख टेंभुर्णीकर यांनी त्यांच्या शुभेच्छा पर भाषणात त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आणि टेंभुर्णीचा इतिहास मुखोदगत असणाऱ्या तांबेकर सरांना अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.




