pub-7425537887339079
ब्रेकिंग

सोपान मारोती शिंदे यांना राज्यशास्त्र विषयात पीएच.डी.

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]
बदनापूर/प्रतिनिधी, दि.1
बदनापूर : बदनापूर तालुक्यातील ढोकसाळ येथील सोपान मारोती शिंदे यांनी आपल्या ज्ञानाचा ओघ कायम वाढवत ठेवून ढोकसाळ गावातून पहिल्यांदा विद्या
वाचस्पती (पीएच.डी.) होण्याचा बहुमान मिळविला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला राज्यशास्त्र विषयात प्रा.डॉ. रविंद्र काळे, बलभीम महाविद्यालय, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली
देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर या संशोधन केंद्रावर‘जालना जिल्हयातील ग्रामीण विकासात ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांची
भूमिका एक चिकित्सक अभ्यास २००१ ते २०२०’ या विषयावर संशोधन कार्ये पुर्ण
केले आहे. शासनाच्या योजनेमुळे ग्रामीण भागाचा होत असलेला विकास, योजनाचे
पुनर्जिवन करणे, महिला सक्षमीकरण, प्रस्थापित नेत्यांची हुकूमशाही यावर प्रकाश टाकला आहे.
१८ मे २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगरच्या राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा कुलसचिव प्रो.डॉ. प्रशांत
अमृतकर सरांच्या अध्यक्षतेखाली, बहि:स्थ परिक्षक प्रो.डॉ.रविंद्र माळी,किसान कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, पारोळा, जि. जळगांव, संशोधन
केंद्र संचालक प्रो.डॉ. शाम कदम, देवगिरी महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर, संशोधनन मार्गदर्शक प्रो. डॉ. रविंद्र काळे, बलभीम महाविद्याल, बीड यांच्यासह प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी यांच्या समक्ष पीएच.डी. मौखिक परिक्षा चांगल्या प्रकारे संपन्न झाला असून सोपान मारोती शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांनी विद्या वाचस्पती (पीएच.डी.) पदवी बहाल केली आहे. याबद्दल
डॉ. सोपान शिंदे यांचे मित्र परिवार व सर्वस्तरातून अभिंनदन व स्वागत होत आहे.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे