जाफराबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न,

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.13
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्वं अभियान अंतर्गत समाधान शिबीर दिनांक 13/05/2026 रोजी सकाळी ठिक 9.30 वाजता नगर पंचायत जाफ्राबाद व तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांचे सौजन्याने नगर पंचायत जाफ्राबादच्या समोरील मैदानात आयोजित करण्यात आले होते सदरील कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती व कार्यक्रमाचे उदघाटक मा.आ.श्री. संतोष पाटील दानवे (अध्यक्ष पंचायत राज समिती महाराष्ट्र राज्यं) यांचे हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
तसेच कार्यक्रमासाठी उपस्थितामध्ये मा.श्री.बी. सरवनन उपविभागीय अधिकारी भोकरदन मा.श्री अविनाश लोढे तहसिलदार तहसिल कार्यालय जाफ्राबाद जाफ्राबाद नगर पंचायतच्या नगराध्यक्षा सौ. कविता दिपक वाकडे उपनगराध्यक्ष शेख रऊफ शेख रहीम इ सर्व सन्माननीय नगरसेवक व नगरसेविका तसेच नगर पंचायत जाफ्राबादचे मुख्याधिकारी श्री. सुरज पांडुरंग बिस्कीटे हे उपस्थित होते नगर पंचायत जाफ्राबादचे मुख्याधिकारी श्री. सुरज पांडुरंग बिस्कीटे यांनी नागरीकांना शासकीय जमीनीवरील निवासी अतिक्रमने नियमीत करण्याबाबत माहिती देऊन सुचना दिल्या नगर पंचायतीमार्फत देण्यात येणारे सुविधा PMAY 1.0 व PMAY 2.0 बांधकाम परवाणगी व चावी वाटप, दिव्यांग निधी वितरन, ब्युटी पार्लर प्रशिक्षण आदेश वाटप, PM SWANDHI निधि वाटप तथा नोंदनी, रमाई आवास योजना निधी वाटप तथा नोंदनी या बाबत नागरीकांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तथा तहसिल कार्यालय जाफ्राबाद मार्फतदेण्यात येणाऱ्या सुविधामध्ये सातबारा, उत्पन्नं प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र व इत्यादी प्रमाणपत्रे मा.श्री अविनाश लोढे तहसिलदार तहसिल कार्यालय जाफ्राबाद यांनी नागरीकांना वाटप केले व इतर सुविधा बाबत माहिती दिली. तसेच या कार्यक्रमामध्ये उपस्थित नगर पंचायत जाफ्राबादचे कार्यालयीन अधिक्षक, श्री. प्रविण वायाळ, कर व प्रशासकीय अधिकारी श्री. भुषण पळसपगार पा.पु.अ.श्री.संतोष हिवाळे, श्री. धिरज गोफणे लिपीक, श्री. रिजवान पठाण लिपीक श्री. रावसाहेब इच्चे लिपीक प्रदिप राऊत अक्षय वाकडे, अनिल वाघ, अजय सोनसाळे कांतीलाल बन्सवाल दिलीप मगरे तसेच PMAY CLTC श्री.शे आवेज शे. नुर व तहसिल कार्यालयीन कर्मचारी, व इत्यादी नगर पंचायत कर्मचारी उपस्थित होते.



