pub-7425537887339079
ब्रेकिंग

आंबा येथील जवाहर नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची भेट

0 4 9 6 1 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि. 22

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज आंबा (ता. परतूर) येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, जालना येथे भेट देऊन विद्यालयातील व्यवस्थेची पाहणी केली. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी पदमाकर गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी परतूर रामेश्वर रेंगे तसेच विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार उपस्थित होते.

विद्यालयात मागील काळात रॅगिंगसंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मित्तल यांनी प्राचार्य श्री. पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून आवश्यक सूचना दिल्या. रॅगिंगसारखे प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत, विद्यालयातील रॅगिंगविरोधी समिती सक्रिय ठेवावी, विद्यार्थ्यांच्या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी तसेच वसतिगृहांवर सातत्याने देखरेख ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनानेही दक्ष राहावे, अशा सूचना त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर रेंगे यांना दिल्या. विद्यार्थ्यांची सुरक्षा व त्यांना भयमुक्त वातावरणात शिक्षण मिळणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विद्यालयाच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेत, विद्यालयास नियमित व सुरळीत पाणीपुरवठा होईल यासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यालय परिसरात सुरू असलेल्या नवीन विद्यार्थी वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी केली. बांधकामाच्या दर्जात कोणतीही कसूर राहणार नाही याची काळजी घ्यावी, दर्जेदार साहित्याचा वापर करून काम विहित मुदतीत पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित कंत्राटदारास दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 6 1 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे