pub-7425537887339079
ब्रेकिंग

एकाच कुटुंबातील दहा जण पवित्र उमराह यात्रेसाठी रवाना

0 4 5 5 2 6
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.2

टेंभुर्णी येथील शेख शेख युसुफ यांच्या एकाच कुटुंबातील तब्बल 10 जण पवित्र उमराह यात्रेसाठी गेले आहेत. यात्रेसाठी गेलेल्यांमध्ये शेख युसुफ व शेख मुनाफ या दोघा भावांसह त्यांचे पुतणे शिक्षक शेख साबेर, शेख मुश्ताक, शेख आरेफ तथा महिला व बालकांसह दहा जणांचा समावेश आहे. मुस्लिम धर्म्यांसाठी अतिशय पवित्र मानल्या जाणारया या उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियातील मक्का व मदिना या पवित्र स्थळी जावे लागते. टेंभुर्णीतून एकाच कुटुंबातील व एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने उमराह यात्रेसाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे सर्वजण गुरुवारी टेंभुर्णी येथून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांना अनेकांनी भेटून या यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. यात्रेला निघण्यापूर्वी स्थानिक मानव सेवा मंडळातर्फे शिक्षक शेख साबेर, शेख मुश्ताक व शेख आरेफ यांचा सत्कार करून त्यांना या पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आपण पवित्र स्थळी संपूर्ण विश्वात सुख, शांती नांदो म्हणून विशेष दुआ करणार असल्याच्या भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केल्या. यावेळी मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख, संजय राऊत, रावसाहेब अंभोरे, अलकेश सोमानी, अब्दुल नबी, बालाजी शेवाळे, शेख सादिक, अंकुश आढावे, संतोष आढावे, जावेद सिद्दिकी , शेख बबलू, मदर सिद्दिकी, शेख सलमान, अनिकेत अंभोरे आदींची उपस्थिती होती. फोटो – पवित्र उमराह यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देताना मानव सेवा मंडळाचे पदाधिकारी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 5 2 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे