pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्ह्यात 16 हजारांहून अधिक निरक्षरांनी दिली नवसाक्षरता चाचणी

0 4 9 7 5 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.28

केंद्र पुरस्कृत उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जालना जिल्ह्यात निरक्षर व्यक्तींना साक्षर करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कार्यक्रमाचा उद्देश 15 वर्षे व त्यावरील वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये वाचन, लेखन आणि संख्याज्ञान ही मूलभूत कौशल्ये विकसित करण्यासोबतच आर्थिक, कायदेविषयक व डिजिटल साक्षरता, आरोग्यविषयक जागरूकता आणि व्यावसायिक कौशल्यांना प्रोत्साहन देणे हा आहे.

सन 2026-27 या वर्षात जालना जिल्ह्यातील एकूण 67 हजार 998 निरक्षरांना साक्षर करण्यासाठी 7 हजार 965 स्वयंसेवकांनी कार्य सुरू केले आहे. याच उपक्रमांतर्गत 25 ऑक्टोबर 2026 रोजी रविवारी आयोजित नवसाक्षरता चाचणी परीक्षेत जिल्ह्यातील 1 हजार 669 केंद्रावर 23 हजार 698  निरक्षरांनी सहभाग नोंदविला. यामध्ये 15 हजार 877 महिला आणि 7 हजार 821 पुरुषांचा समावेश होता.

तालुकानिहाय परीक्षेला उपस्थित राहिलेल्या निरक्षरांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. जालना तालुक्यात 2 हजार 954, बदनापूर 2 हजार 940, अंबड 3 हजार 476, घनसावंगी 2 हजार 110 , परतूर 1 हजार 762, मंठा 3 हजार 465, भोकरदन 4 हजार 583 आणि जाफराबाद तालुक्यात 2 हजार 407 निरक्षरांनी चाचणी परीक्षेत सहभाग घेतला.

या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. परीक्षेच्या आयोजनासाठी शिक्षणाधिकारी (योजना)  लता सानप, उपशिक्षणाधिकारी (योजना) रवी जोशी, सहायक योजना अधिकारी वसीम पटेल, प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन सहकार्य केले. जिल्ह्यातील निरक्षर व्यक्तींना साक्षर करून त्यांना जीवनोपयोगी कौशल्ये प्राप्त करून देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 5 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे