pub-7425537887339079
ब्रेकिंग

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.12

 राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे