pub-7425537887339079
ब्रेकिंग

भव्य ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ पिंगळी येथे उत्साहात

0 4 2 1 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

हदगाव/ प्रभाकर डुरके,दि.28

पिंगळी गावात गोपाळ समाज बांधवांच्या कष्टातून निर्माण केलेल्या मंदिरामध्ये भक्तिमय वातावरणात ‘श्री राधा–कृष्ण मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा’ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. दिनांक ३ व ४ मे २०२६ रोजी पार पडणाऱ्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात धार्मिक उन्मेषाचे वातावरण निर्माण झाले असून समाज बांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून वेदघोष, पूजन, कीर्तन, भजन आणि प्रवचनांचा आध्यात्मिक संगम अनुभवायला मिळणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या या मंगल कार्यासाठी परिसरातील तसेच दूरवरच्या गावांमधून भाविक व गोपाळ समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रारंभी मंत्रोच्चार, ध्वजारोहण, कलश पूजन, देवतांची स्थापना व पूजन अशा विविध विधी पार पडणार असून, सायंकाळी भव्य मिरवणूक गाव प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शुभमुहूर्तावर मूर्तींची विधिवत प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. या धार्मिक विधीसाठी वेदमूर्ती श्री. वैजनाथ महाराज कंठाळे व गुरुजन वर्ग तामसा व परिसरातील साधुसंत महंत वारकरी यांचे प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच विविध संत-महंत व कीर्तनकारांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरण अधिकच रंगणार आहे. या सोहळ्यात आमदार श्री बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते सांस्कृतिक सभागृहाचे भूमिपूजन होणार असून, ह.भ.प. श्री भिमराव महाराज सूर्यवंशी यांचे काल्याचे कीर्तन हा विशेष आकर्षण ठरणार आहे. याशिवाय नामांकित भजनी मंडळेही आपल्या सादरीकरणातून भक्तिरसाची उधळण करणार आहेत. गोपाळ समाज बांधव व समस्त गावकरी मंडळी पिंगळी यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला असून, शेवटी गुरुवर्य शोभा माय यांच्यावतीने सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगलमय सोहळ्याचा लाभ घ्यावा व उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गोपाळ समाज बांधव व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 1 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे