जालना जिल्हा किशोर–किशोरी कबड्डी संघाची निवड चाचणी १० ऑक्टोबर रोजी
राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी जिल्हा संघाची निवड; बदनापूर येथील पाथ्रीकर कॅम्पसमध्ये आयोजन

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने दिनांक १९ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत पाथरी, जिल्हा परभणी येथे होणाऱ्या ३७ व्या किशोर–किशोरी गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेसाठी जालना जिल्ह्याच्या मुला-मुलींच्या कबड्डी संघांची निवड चाचणी दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता, आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर, जिल्हा जालना येथे आयोजित करण्यात आली आहे.
जालना जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. माधवी काळे-खरे व प्रभारी सचिव डॉ. देवेश पाथ्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड चाचणी होणार आहे.
या निवड प्रक्रियेसाठी अक्षय गोरंट्याल, रामदास निहाळ यांच्यासह जिल्हा कबड्डी संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींचे सहकार्य लाभणार आहे.
जिल्ह्यातील गुणवंत कबड्डीपटूंना सुवर्णसंधी
या निवड चाचणीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेत जालना जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. खेळाडूंची शारीरिक क्षमता, चपळता, तांत्रिक कौशल्य, सांघिक खेळ व प्रत्यक्ष मैदानावरील कामगिरी या निकषांवर संघ निवड करण्यात येणार आहे.
खेळाडूंची पात्रता :
– किशोर गट (मुले) : जन्मतारीख १३ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची; वजन कमाल ६० किलो.
– किशोरी गट (मुली) : जन्मतारीख ३१ डिसेंबर २०१० किंवा त्यानंतरची; वजन कमाल ५५ किलो.
निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी जन्मतारखेचा अधिकृत पुरावा, आधारकार्ड व आवश्यक क्रीडा कागदपत्रे सोबत आणावीत.
राष्ट्रीय स्तरावर चमकण्याची संधी
राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून राष्ट्रीय किशोर–किशोरी कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संभाव्य संघातील खेळाडूंची निवड होणार असल्याने ही जिल्हा निवड चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
जालना जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, क्रीडा मंडळे, कबड्डी क्लब, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक व पात्र मुला-मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवड चाचणीत सहभाग नोंदवावा, असे आवाहन अध्यक्षा सौ. माधवी काळे-खरे, प्रभारी सचिव डॉ. देवेश पाथ्रीकर, अक्षय गोरंट्याल डॉक्टर प्रशांत तेलगड व रामदास निहाळ यांनी केले आहे संपर्कासाठी डॉ. भुजंग डावकर) संजय येळवंते रवींद्र ढगे दिनेश वाघ अमोल राठोड यांच्याशी संपर्क करावा.


