दिव्यांगानी ऑन दि स्पॉट शिबीराचा लाभ घ्यावा – समीर पटेल

हदगाव. प्रभाकर डुरके,दि.22
नांदेड जिल्हातील अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तींसाठी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण नांदेड, एस. आर. ट्रस्ट मध्य प्रदेश, भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) मुंबई, यांच्या संयुक्त विदयमाने, अस्थिव्यंग दिव्यांगासाठी कृत्रिम हात पाय व कॅलीपर्स मोजमाप व तात्काळ दिव्यांग साहित्य वितरणासाठी “ ऑन दि स्पॉट ” शिबीराचे आयोजन तालुका निहाय करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र, यु डी आय डी कार्ड, आधार कार्ड, राशन कार्ड, व इतर कागदपत्रे घेऊन जास्तीस जास्त अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तीने लाभ घ्यावा. असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केले आहे. नांदेड जिल्हातील तालुका स्तरावर 23 जुन ते 8 जुलै या कालावधीत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये हे शिबिर घेण्यात येणार आहेत. शिबिरामध्ये अस्थिव्यंग दिव्यांग व्यक्तीसाठी कृत्रिम हात पाय, कॅलिपर्स, ए एफ ओ, स्मार्ट बुट व इतर आवश्यक साहित्य साधनाचा मोजमाप घेऊन लाभार्थ्यांना तात्काळ साहित्य उपलब्ध करून देणार आहेत. मुदखेड २३, अर्धापुर २४, हदगांव २५, माहुर २६, किनवट २७, हिमायतनगर २८, भोकर २९, उमरी ३० जुन तर धर्माबाद १, बिलोली २, देगलुर ३, नायगांव ४, मुखेड ५, कंधार ६, लोहा ७, नांदेड ८ जुर्ले २०२६ रोजी अस्थिव्यंग दिव्यांगासाठी कृत्रिम हात पाय मोजमाप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या शिबीराचा गरजु अस्थिव्यंग दिव्यांगानी आवश्यक लाभ घ्यावा, असे आवाहन दिव्यांग विकास संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष समीर पटेल यांनी केला आहे. त्यावेळी त्यांच्या सोबत जमीर पटेल, अजिंक्य अशोक चव्हाण, कुबेर राठोड, फारुख कुरेशी,पवन भोरे, निहाल पटेल, अहेमद भाई, रमेश गोडबोल, शबीर बेग, गजानन शिंगणे, शेख इमरान, सलीम भाई, धुरपतर सुर्यवंशी, शेख साजिद, संविधान जोगदांडे, नासेर पेंटर, बंडु पाटे आदीसह यावेळी उपस्थित होते.



