pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी जवळ अपघात सत्र सुरूच. टेंभुर्णीजवळ भीषण अपघात: दुचाकीचा स्फोट होऊन गाडी जळून खाक,एक जण गंभीर जखमी.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.8

टेंभुर्णी परिसरात आज एक काळजाचा थरकाप उडवणारी अपघाताची घटना घडली. भरधाव दुचाकीचा भीषण अपघात होऊन झालेल्या स्फोटात दुचाकी जागीच जळून खाक झाली आहे. या दुर्घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आज सायंकाळच्या सुमारास टेंभुर्णी जवळील गणेशपुर पाटीजवळ मुख्य रस्त्यावर हा अपघात झाला. दुचाकीस्वार आपल्या वाहनावरून जात असताना अचानक‌ इंडीका कारला ही दुचाकी घासली गाडीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी जोरात आदळली. हा आघात इतका भीषण होता की, आदळल्याबरोबर दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाला. काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुचाकी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.

गाडीचा झाला कोळसा.

घटनेची माहिती मिळताच टेंभूर्णी पोलिस ठाण्याचे पिएस आय बाबासाहेब खार्डे व पोलीस कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. व लगेच अग्नीशामक दलाला पाचारण करण्यात आले मात्र,आगीची तीव्रता जास्त असल्याने गाडीला वाचवता आले नाही. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आगीच्या ज्वाळा प्रचंड उंच होत्या,ज्यामुळे दुचाकीचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला आहे.
जखमीची प्रकृती गंभीर
या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.जखमीच्या अंगावर जखमांचे प्रमाण मोठे असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
या अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे