pub-7425537887339079
ब्रेकिंग

पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोनच्या विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती परीक्षेत उच्च भरारी.

उरण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला.

0 4 7 9 9 0
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.16
रयत शिक्षण संस्थेच्या पंचरत्न इंग्लिश मीडियम स्कूल, पिरकोन या शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. शाळेचा गुणवंत विद्यार्थी कु. विधेश सदाशिव जोशी याने उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत २३८ गुण मिळवून उरण (ग्रामीण) तालुक्यात प्रथम क्रमांक व  रायगड जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत सातवा क्रमांक  पटकवून त्याने बहुमान मिळविलेला आहे.
आपल्या चिकाटी, मेहनत, सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांनी घेतलेले कष्ट  आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर विधेशने हे नेत्रदीपक यश संपादन केले. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, शाळेचा नावलौकिक उंचावला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने विधेशचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्याच्या या यशामध्ये त्याचे पालक, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद आणि शाळेचे मार्गदर्शन यांचा मोलाचा वाटा आहे.
विधेशच्या या उत्तुंग यशाबद्दल रयत शिक्षण संस्था, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी  एम. के. कोंगेरे, विभागीय अधिकारी व्ही. यू. जगताप, स्थानिक स्कूल समितीचे ज्येष्ठ सदस्य रमाकांत गावंड,  अनंत हरिश्चंद्र गावंड,  आनंत नारायण गावंड, शाळा सल्लागार समितीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापिका  निकिता गायकवाड तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
विधेशच्या या उत्तुंग भरारीबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिले आहेत.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे