स्व. विनोद कळंबे सर यांच्या संकल्पनेतून ऊसतोड कामगारांना दिवाळी फराळ वाटप उपक्रम.

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.7
युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने मागील दहा वर्षापासून स्व. विनोद कळंबे सर यांच्या संकल्पनेमधून ऊसतोड कामगारांच्या लेकरांची दिवाळी गोड करण्यासाठी फराळ वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने दहा वर्षापासून राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने याही वर्षी स्व विनोद कळंबे सर हे आपल्यात नाहीत परंतु त्यांचा संकल्पनेचा वारसा पुढे नेण्याचं काम युगंधर प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांनी निरंतर चालू ठेवण्याचा संकल्प केला .व त्याच अनुषंगाने याही वर्षी दिवाळीनिमित्त 50 कुटुंबांच्या ऊसतोड बांधवांच्या फडावर जाऊन त्यांना दिवाळीनिमित्त साडी, चिवडा, बुंदी, साबण, तेल, उटणे,पणत्या इत्यादी वस्तूंची एक किट तयार करून सर्व पन्नास कुटुंबांना वितरित करण्यात आली.यावेळी स्व. विनोद कळंबे सर यांची उणीव निश्चितच जाणवली .परंतु त्यांच्या सामाजिक उपक्रमचा वसा घेत त्यांचे चिरंजीव राजवर्धन विनोद कळंबे हे आवर्जून उपस्थित राहून या उपक्रमामध्ये सहभागी झाले. यावेळी जि. प.शिक्षक सहकारी पतसंस्था जाफराबादचे चेअरमन गणेश पवार , राज्य आदर्श शिक्षक जमीर शेख ,केंद्रप्रमुख सुधाकर चिंधोटे ,प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका नेते तथा शिक्षक पतसंस्था संचालक दिपक चव्हाण, युगंधर प्रतिष्ठानचे सचिव धनंजय मुळे,स्वराज्य शिक्षक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश चव्हाण ,भगवान चव्हाण सोपान शिंदे पत्रकार सुनील जोशी, छत्रपती साखर कारखान्याचे कर्मचारी कैलास तायडे पैनगंगा साखर कारखान्याचे कर्मचारी प्रल्हाद चव्हाण,पांडुरंग चव्हाण ,इत्यादी उपस्थित होते.




