pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेंभुर्णी येथे वटपौर्णिमा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला असून सुवासिनींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची मनोभावे पूजा केली

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

टेंभुर्णीत वटपौर्णिमा उत्साहात; सुवासिनींकडून वटवृक्षाचे पूजन टेंभुर्णी :जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी व परिसरात आज वटपौर्णिमेचा सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या पतीला दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य लाभावे, या प्रेरणेने गावातील सुवासिनींनी सकाळपासूनच वटवृक्षाची पूजा करण्यासाठी गर्दी केली होती.महिलांनी पारंपरिक पेहराव करून वटवृक्षाला हळद-कुंकू, फळे आणि फुले अर्पण केली. वडाच्या झाडाला सुती दोरा गुंडाळून महिलांनी मनोभावे प्रदक्षिणा घातल्या आणि सात जन्माच्या सोबतीसाठी प्रार्थना केली. यंदा महिलांनी वडाच्या फांद्या तोडण्याऐवजी थेट जिवंत वटवृक्षाची पूजा करून पर्यावरणपूरक सण साजरा केला. एकमेकींची ओटी भरून सुवासिनींनी वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे