पादुका दर्शन सोहळ्यास महेश महाराज यांचे प्रवचन संपन्न. पादुका दर्शन हे साक्षात देवाच्या दर्शना सारखे.महेशगिरी महाराज.

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.16
टेंभुर्णी येथील रंगनाथ महाराज यांच्या पावन स्पर्श ने विस्थापित झालेल्या गणपती मंदिर येथे गजानन महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्या निमित्य गौरी आश्रम मठाधिपती श्री महेश गिरी महाराज यांच्या मधुर वाणीतून कीर्तन रुपी सोहळा पार पडला. ओम नमो गुरुदेवां या मधुर मंत्राने सुरू झालेल्या सेवांना सुरू झालेल्या पादुका दर्शन ही पुण्याच्या कामातून एक महत्त्वाचे पुण्य असल्याचे त्यांनी सांगितले.पादुका दर्शन हे तुमच्या भाग्याचा एक काम असून पादुका दर्शन म्हणजे साक्षात देवाचे दर्शन होते असे महेश गिरी महाराज यांनी नमूद केले. संतांनी आपल्या पायाने अनेक ठिकाणी जाऊन पाई यात्रा केल्या आपल्या शरीरातून कष्ट करून देवाची पूजा नामस्मरण केले. म्हणून त्यांच्या पादुका दर्शन ला मोठे महत्व आहे.पादुका दर्शन ला किती महत्व आहे हे त्यांनी महाभारत आणि रामायण चे काही प्रसंग सांगितले.भगवंताचे पादुका चरण स्पर्श म्हणजे पुण्य कर्म होय हे सगळ्याच्या भाग्यात नसते असे त्यांनी सांगून हा आजचा चांगला योग आल्याचे त्यांनी सांगितले.पादुका दर्शन होणे म्हणजे एक प्रकारे सेवा असून ही सेवा टेंभुर्णी करांच्या भाग्याचे काम होय. टेंभुर्णी येथील भातोडी येथील गजानन महाराज यांच्या मंदिर बांधकाम चे भव्य काम सुरु झाले असून येथे मोठा भक्त परिवार आहे. या भक्त परिवार कडून आयोजित या कार्यक्रमाला मोठा भक्त परिवार उपस्थित होता.येथील भक्त राजू करवंदे यांनी त्यांच्या आई वडील यांच्या आठवणीतील ठेवा उजागर करण्यासाठी ही पादुका दर्शन कार्यक्रम संपन्न केला होता. गण गणात बोते या गजाजन महाराज यांच्या मंत्राचा मोठ्या गजरं ने सगळा परिसर भक्तीमय झाला होता. पादुका मध्ये एक वेगळी ऊर्जा असते ती स्पर्श केले त्यामुळे तुमचा स्पर्श भगतवांचे स्पर्श झाल्या सारखे असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे आभार ह.भ.प.रघुराम उखर्डे यांनी केले. शेवटी महाप्रसाद ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


