काँग्रेस सोशल मीडिया तालुकाध्यक्षपदी रितेश घोलप यांची नियुक्ती

अनिल भालेकर/अंबड,दि.8
अंबड येथील होतकरू अभ्यासू सामंजस्य व अनेकांची अत्यंत स्नेहपूर्ण मैत्रीपूर्ण संबंध असणारे रितेश घोलप यांची काँग्रेस सोशल मीडिया तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
खासदार कल्याण काळे यांच्या मार्गदर्शनानुसार तालुकाध्यक्ष कल्याण तायडे यांच्या नेतृत्वा नुसार जिल्हाध्यक्ष रघुवीर गुडे यांच्या आदेशानुसार रितेश घोलप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे विचार जनतेपर्यंत प्रभावी पोहोचवण्यासाठी रितेश घोलप यांची कार्यतत्परता निष्ठा आणि पक्षाप्रती असलेल्या समर्पणाची दखल घेऊन त्यांनाही नियुक्ती देण्यात असल्याचे नियुक्ती पत्रात नमूद केलेले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात काँग्रेस सोशल मीडिया अधिक मजबूत होईल व पक्षाची भूमिका जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचेल असा विश्वास काँग्रेसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
तालुकाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रितेश घोलप यांचे परमेश्वर भागवत,विजय पुंड, रंगनाथ भाकरे,गजानन जाधव, अमोल आढावे,माऊली पांढरे, बाळू नरवडे,जय भोजने, ओमकार तुपे,संदीप राऊत
कृष्णा नेमाने,अजिंक्य वाघुंडे
शुभम जराड,शुभम भिसे
जयेश खांडेभराड यांच्यासह आदींनी अभिनंदन व कौतुक केले आहे.




