pub-7425537887339079
ब्रेकिंग

पद्मभूषण डॉ. बी. आर. बारवाले यांची ९५ वी जयंती.

0 4 7 9 8 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 14

दिनांक १३ ऑगस्ट २०२६ रोजी आंबेगाव येथे महिकोचे संस्थापक तथा “Father of Indian Seed Industry” पद्मभूषण डॉ. बद्रीनारायण आर. बारवाले यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बी. आर. बारवाले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी आंबेगावचे ग्रामस्थ, शेतकरी बांधव, शाळेतील शिक्षक वृंद तसेच महिको कंपनीचे प्रतिनिधी व आयोजक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

शेतकरी वर्गातून श्री. बळीराम शिंदे, श्री. अशोक शिंदे, श्री. रामेश्वर शिंदे आणि श्री. कैलास देठे ,श्री कुंडलिक चौधरी,दामोदर फलके यांची उपस्थिती लाभली.

शाळेचे मुख्याध्यापक श्री. जी. डी. जाधव सर तसेच देवकर सर आणि बुधवत सर उपस्थित होते.

महिको कंपनीच्या वतीने श्री. बाबासाहेब उंबरे, श्री. पवन कानडाजे आणि श्री. जीवन सुसर उपस्थित होते.

तसेच कार्यक्रमात महिको कंपनीचे आयोजक श्री. विठ्ठल चौधरी, श्री. बालाजी चौधरी आणि श्री. संतोष खरात यांची उपस्थिती लाभली.

यावेळी डॉ. बारवाले यांनी भारतीय बियाणे उद्योगाच्या विकासासाठी तसेच शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी केलेल्या अमूल्य कार्याची माहिती उपस्थितांना देण्यात आली. त्यांची दूरदृष्टी, शेतकरीकेंद्री विचारसरणी, संशोधनाला दिलेले प्रोत्साहन आणि कृषी क्षेत्रातील योगदान आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

डॉ. बारवाले यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी गुणवत्ता, विज्ञान आणि नवकल्पनांचा उपयोग करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आंबेगाव ग्रामस्थ, शेतकरी बांधव, शिक्षक वृंद आणि महिकोच्या सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

पद्मभूषण डॉ. बी. आर. बारवाले यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 8 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे