pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुण्यनगरीत गंगाधाम येथे गुरुपोर्णिमा दिनी सजावटीतुन ‘साई विठ्ठल’ अवतरले

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

पुणे/आत्माराम ढेकळे,दि.3

पुणे — गुरुपोर्णिमा दिनी पुण्यनगरीतील गंगाधाम परिसरातील ॐश्री साई विश्व नरेंद्रधाम येथे सजावटीतुन ‘साई विठ्ठल’ अवतरले.साई विश्वनाथ दरबार सेवेकरी मंडळाच्या वतीनेआयोजित विविध कार्यक्रमात सर्व भाविकांनी दर्शन लाभ घेतला.
प.पू. श्री सद्गुरु संतनाथबाबा यांनी स्थापन केलेल्या ॐश्री साई विश्व नरेंद्रधाम ,गंगाधाम बिबवेवाडी येथील विश्वनाथबाबा मंदिर येथे “गुरुपोर्णिमा”निमित्ताने कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये सकाळ ते दुपार पर्यंत अभिषेक,आरती,हवन,धुप आरती तर सायंकाळी भजन , सांजआरती ,महाआरती,शेजआरती चा समावेश होता.यामध्ये गुरुमाऊली आईसाहेब नीताजी यांचे पाद्यपूजन करुन गुरुचा मानपान करण्यात आला.प्रामुख्याने या गुरुपोर्णिमाचे औचित्य साधुन गुरुमाऊलीचा मुलगा प्रणव यास गुरु -शिष्य परंपरेतील कानमंत्र गुरुमाऊली आईंनी देऊन या दरबाराचा पुढील उत्तराधिकारी त्यास घोषित करण्यात आले.प्रणव याने यापुर्वीच संतनाथबाबाच्या कृपाशिर्वादाने पूजाअर्चा,आरती माहिती ज्ञान आत्मसात केले.तर गुरुमाऊली आई च्या सान्निध्यात राहुन भजन शिक्षण घेतले.व भाविकांसी संपर्क स्थापित केले.यापुढेही गुरु-शिष्य परंपरा कायम ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असेल गुरुमाऊली आईने आशा व्यक्त केली.या कार्यक्रमात मानपान कार्यक्रम प्रसंगी अध्यात्मज्ञान प्रसारक डी.आत्माराम यांनी “गुरुपोर्णिमा “चे महत्व मनोगतात व्यक्त करुन ‘खरे संत ओळखण्याची आज नितांत गरज आहे.ज्यांच्या अंगी मोह ,स्वार्थीपणा नसतो व ते निस्वार्थ भावनेने समाजात कल्याणकारी प्रबोधन करुन स्वतःला अर्पित करतात .तेच खरे संत असतात .अशा संतसमान व्यक्तीला जीवनात गुरु केले तर जीवन सार्थक होईल.असे त्यांनी यावेळी प्रतिपादन केले. भावी उत्तराधिकारी प्रणव याचे अभिनंदन करुन त्यास शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमात भजन सौ.सुजाता कोठारी, एल.के.गुप्ता,साईराज,प्रणव,शिवसहायसिंह बनारसवाले आदींनी सादर केले.प्रामुख्याने गुरुपोर्णिमा निमित्ताने नितिन पेठारे यांनी प्रतिशिर्डी मंदिराची सोनेरी आकर्षक सजावट तयार केली.तर याठिकाणी प.पू.श्री,संतनाथबाबा समाधी चरण पादुका च्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाच्या वर ईशा पाटोळे हिने सजावटीतुन हुबेहूब विठ्ठल साकारला.अनेक भाविकांनी या कलाकृतीचे कौतुक केले.आयोजित महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यास शशिकांतजी मोरे ,एल के गुप्ता, नितिन पेठारे ,जयप्रकाश गुप्ता,महादेव जाधव ,साहिल शहा,सुरेश काळे आदी सेवेकरी मंडळीनी सहभाग घेतला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे