pub-7425537887339079
ब्रेकिंग

दोन महिन्यांपासून काम ठप्प नागरिक, प्रवासी हैराण,प पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करावे.. टेंभूर्णी-डावरगाव देवी दहेगाव रस्त्याचे काम रखडले

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.

जाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी ते डावरगाव देवी या महत्त्वाच्या रस्त्याचे बांधकाम गेल्या दोन महिन्यांपासून ठप्प पडल्याने नागरिक,प्रवासी शेतकरी, विद्यार्थी आणि भाविकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. डावरगाव येथील प्रसिद्ध देवी मंदिराकडे जाणारा हा प्रमुख मार्ग अर्धवट अवस्थेत असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पर्यटन स्थळांमध्ये असणारे या देवी मंदिरासाठी जाण्यासाठी रस्ता नाही, तसेच दहिगाव निमखेडा खापरखेडा आधी गावांना जोडणाऱ्या या रस्त्यांवरून जाणारी शेतकरी प्रवासी विद्यार्थी त्रस्त झालेली आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यानंतर काही अंतरावर काम करण्यात आले; मात्र त्यानंतर ठेकेदाराने काम अचानक बंद केल्याचे चित्र आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, उघडी गिट्टी आणि मुरूमाचे ढिगारे असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. डावरगाव देवी मंदिर हे परिसरातील श्रद्धास्थान असून दररोज शेकडो भाविक येथे दर्शनासाठी येतात. नवरात्रोत्सव, पौर्णिमा आणि इतर धार्मिक कार्यक्रमांच्या काळात हजारोंच्या संख्येने – भाविकांची गर्दी होते. मात्र खराब रस्त्यामुळे मंदिराकडे जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे काम रखडले असून संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधीही याकडे दुर्लक्ष करत आहेत. अनेकदा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. रस्ता चिखलमय झाल्यास भाविक, विद्यार्थी, शेतकरी तसेच रुग्णवाहिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. चौकट :- खराब रस्त्यामुळे अपघाताचा धोका ररस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने रस्त्यावर धूळ, गिट्टी व दगड उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक, शेतकरी, शाळकरी मुले व नागरिकांना मोठा त्रास होत आहे. पावसाळा जवळ आला असून खराब रस्त्यामुळे अपघातांचा धोका तसेच कंबरदुखी, पाठदुखी व श्वसनाचे आजार वाढत आहेत. संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करावे. – प्रताप पाटील नवले, ( सामाजिक कार्यकर्ते ) चौकट :- रखडलेले काम लवकर सुरू करावे टेंभूर्णी-डावरगाव देवी दहेगाव रस्त्याचे काम गेल्या दोन महिन्यांपासून बंद असल्याने ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी तसेच भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असून अपघाताचा धोकाही वाढला आहे. पावसाळा जवळ आल्याने संबंधित विभागाने व ठेकेदाराने तातडीने दखल घेऊन रखडलेले काम सुरू करावे आणि रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, – त्रस्त नागरिक व प्रवासी डावरगाव देवी

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे