pub-7425537887339079
ब्रेकिंग

विदर्भातील शेतकऱ्यांनी अनुभवली मराठवाड्यातील शून्य मशागत शेती पद्धती

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी जालना जिल्ह्यातील भोकरदन - जाफराबाद तालुक्यात सुरु असलेली एसआरटी अर्थात शून्य मशागत शेती अनुभवली

0 5 4 6 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 26

महाराष्ट्र सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्री. श्याम गट्टाणी हे मेहकर तालुक्यातील विविध गावातील शेतकऱ्यांसह पिंपळगाव बारव येथील श्री. भगवानराव पिंपळे, श्री. रणधीर पिंपळे, श्री. उद्धव थोटे, श्री. भागाजी आप्पा थोटे, श्री. अविनाश थोटे, श्री. पळसखेड पिंपळे येथील श्री. गणेश बापू पिंपळे, श्री. राजू भाऊराव पिंपळे, श्री. राजू प्रभाकर पिंपळे, माहोरा येथील श्री. सुधाकर वाघ यांच्या शेतातील कापूस, तूर, मका या शून्य मशागत तंत्र शेतीची पाहणी करून समाधान व्यक्त केले.
यावेळी ॲग्रोव्हिजन गटशेती संघांचे संस्थापक प्रमुख श्री. संजय मोरे पाटील, डॉ. गणेश पोटे, श्री. कृष्णा मारग, श्री. विठ्ठल कुडके, श्री. राम डव्हळे, श्री. राम पवार, श्री. भगवान इंगळे, श्री. दिनकर घेवंदे, श्री. गणेश हरमकार, श्री. केशव दुनगहू, श्री. भास्कर जाधव हे मेहकर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
_एस. आर. टी. संवर्धित शेती तंत्रज्ञान’, जी शून्य मशागतीच्या आधारे नांगरणी आणि चिखलणी न करता कायमस्वरूपी गादीवाफ्यांवर केली जाणारी आधुनिक शेती पद्धत आहे. महाराष्ट्रातील नेरळ (कर्जत) येथील कृषी तज्ज्ञ श्री. चंद्रशेखर भडसावळे यांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे जे की विविध पिकांसाठी अत्यंत यशस्वी ठरत आहे. एकदा जमिनीवर गादीवाफे किंवा बेड तयार केल्यानंतर पुढील सुमारे १५ ते २० वर्षे जमिनीची नांगरणी, वखरणी किंवा चिखलणी करण्याची गरज पडत नाही. शेतात ठराविक मापाचे बेड तयार केले जातात, ज्यामुळे पिकाच्या मुळांना पुरेसा ऑक्सिजन आणि ओलावा मिळतो व अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो. पीक कापणीनंतर त्याची मुळे उपटून न टाकता जमिनीतच कुजू दिली जातात. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढतो आणि गांडुळांची संख्याही झपाट्याने वाढते. तण उपटून न काढता शिफारस केलेल्या तणनाशकांचा नियंत्रित वापर करून ते जागेवरच वाळवले जाते, ज्याचे पुढे उत्तम नैसर्गिक आच्छादन तयार होते. नांगरणी, चिखलणी, हे कष्टाचे काम वाचल्यामुळे उत्पादन खर्चात ३०% ते ४०% आणि मजुरीत ५०% पर्यंत बचत होते. चिखलणी न केल्यामुळे पावसाच्या पाण्यासोबत वाहून जाणारा सुपीक गाळ वाचतो आणि जमिनीची धूप थांबते. पावसाने मोठा खंड दिला तरी गादीवाफ्यांमधील ओलाव्यामुळे पिके लगेच सुकत नाहीत, तसेच अतिवृष्टी झाल्यास पाणी वाहून गेल्याने पीक सडत नाही. या सर्व तंत्रज्ञाची उपस्थित सर्व शेतकऱ्यांना एसआरटी धारक शेतकऱ्यांकडून उस्फुर्त माहिती मिळाली._

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 4 6 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे