pub-7425537887339079
ब्रेकिंग

उरण महाविद्यालयाच्या वतीने वाचन विकास चळवळ.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

 उरण/विठ्ठल ममताबादे,दि.1

कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे . पिरकोन ता.उरण जि.रायगड येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे ग्रंथालय स्थापना व भाषण विकास चळवळ कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय निर्मिती व वाचनाची आवड विद्यार्थ्यांमध्ये व गावातील लोकांमध्ये निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने विविध गावांमध्ये ग्रंथ भेट देऊन तेथे वाचन संस्कृती रुजवण्याचा प्रयत्न केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून पिरकोन येथे महाविद्यालयाच्या वतीने रु.६००० किमतीची पुस्तके भेट दिली गेली. महाविद्यालयाची प्राचार्य डॉ.वाल्मीक गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती कलावती पाटील (सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत पिरकोन) शाळेचे चेअरमन जीवन गावंड तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. व्ही.एस. इंदुलकर उपस्थित होते. जीवन गावंड यांनी वाचनाची आवड विद्यार्थ्यांनी निर्माण केली पाहिजे त्याशिवाय आपले भविष्य निर्माण करता येणार नाही असे सांगितले. तर प्रा.व्ही एस इंदुलकर यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार व्यक्त करताना आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. ए.आर. चव्हाण यांनी वाचनाचे महत्त्व विद्यार्थ्यांसमोर विशद केले. मुख्याध्यापिका श्रीमती ए.ए. पाटील, प्रा. गाडे सर, डॉ. एच. के.जगताप, डॉ.ए. के. गायकवाड,डॉ. एम.जी. लोणे प्रा. विनिता तांडेल शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक प्रेरणादायी, चरित्र ग्रंथ व मूल्य शिक्षण, पर्यावरण विषयक, व्याकरण, आत्मविश्वास, भाषण कौशल्य इत्यादी विविध विषयांची पुस्तके भेट देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे