श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वाहतुकीच्या मार्गात बदल

जालना/प्रतिनिधी,दि.5
श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन या दिंडीमध्ये 700 ते 800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी ही दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असुन दि. 7 ऑगस्ट 2026 ते दि. 8 ऑगस्ट 2026 पर्यंत पोलीस स्टेशन गोंदी हद्दीत मुक्कामी राहून दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी गोलापांगरी मार्गे जालना शहराकडे प्रयाण करणार आहे.
दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन जड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशान्वये शहागड ते अंबड रोडवरील येणाऱ्या व जाणाऱ्या अवजड वाहनांना दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी ते 9 ऑगस्ट 2026 रोजी दररोज सकाळी 4.00 ते रात्री 8.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
हरीओम हॉटेल, वडीगोद्री उड्डाण पुलाचे खालुन व बाजुने येणारी अवजड वाहने – अंबड मार्गे- जालनाकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहने दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग -वडीगोद्री उड्डाण पुल- पाचोड फाटा- अंबड मार्गे जालनाकडे जातील व येतील.
हरीओम हॉटेल, वडीगोद्री उड्डाण पुलाचे खालुन व बाजुने येणारी अवजड वाहने – अंबड मार्गे – जालनाकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहने दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग हरीओम हॉटेल, वडीगोद्री उड्डाण पुलाचे खालुन व बाजुने येणारी अवजड वाहने पाचोड फाटा- जामखेड फाटा- जामखेड –किनगांव चौफुली – बदनापूर मार्गे जालनाकडे जातील व येतील.
हरीओम हॉटेल, वडीगोद्री उड्डाण पुलाचे खालुन व बाजुने येणारी अवजड वाहने – अंबड मार्गे – जालनाकडे जाणारी व येणारी व सर्व अवजड वाहने दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग- हरीओम हॉटेल, वडीगोद्री उड्डाण पुलाचे खालुन व बाजुने येणारी अवजड वाहने- पाचोड फाटा- जामखेड फाटा- जामखेड – किनगांव चौफुली – बदनापूरमार्गे जालनाकडे जातील व येतील. अंबडकडून जालनाकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहने दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग- पाचोड फाटा- किनगाव चौफुली- बदनापूरमार्गे जालनाकडे जातील व येतील.
जालनाकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी व येणारी सर्व अवजड वाहतुक दि. 8 ऑगस्ट 2026 व दि. 9 ऑगस्ट 2026 रोजी दररोज सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग – जालना-रोहनवाडी- सुतगिरणीमार्गे घनसावंगीकडे जातील व येतील.
घनसावंगीकडुन अंबडमार्गे बीडकडे जाणारी सर्व अवजड वाहने दि. 7 ऑगस्ट 2026 ते दि. 8 ऑगस्ट 2026 रोजी दररोज सकाळी 4.00 ते रात्री 8.00 पर्यंत पर्यायी मार्ग- तिर्थपुरी – गोंदी- शहागडमार्गे बीडकडे जातील व येतील.




